भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)कडून जातीयवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चा पॉलीट ब्युरो जातीयवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष
(मार्क्सवादी) दिल्लीजवळ
लोकल ट्रेनमध्ये एका मुस्लीम कुटुंबावर झालेल्या जातीयवादी हल्लाचा तीव्र शब्दात
निषेध करीत आहे. या हल्ल्यात जुनैद या १५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला व
त्याचा भाऊ शाकीर याच्यावर चाकूने गंभीर घाव करण्यात आले आहेत. त्यांचा तिसरा भाऊ
हाशिम हा देखील या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे लोक
घोषणाबाजी करत मोठे चाकू, सुरे घेऊन त्यांच्यावर चाल करून गेले.
या तरूण मुलांनी दिल्लीला
साधारणपणे सायंकाळी ५ वाजता हरियाणातील बल्लभगढ येथे जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडली.
जुनैद आणि त्याचा धाकटा भाऊ दोघे सूरत येथील एका मदरश्यामध्ये शिकत होते व ते
ईदच्या वार्षिक सुट्टीसाठी आपल्या घरी आलेले होते. तुघलकाबाद स्टेशनवर काही लोक
चढले आणि त्यांनी ह्या भावांना घाणेरड्या जातीयवादी भाषेत छळायला सुरवात केली.
त्यांनी विरोध केला असता, त्यांच्यावर जातीयवादी घोषणा देत हल्ला केला गेला.
जुनैदला गाडीतच मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. शाकीरची दाढी उपटून काढण्याचा
प्रत्न केला गेला आणि त्याला तीनदा चाकूने भोसकण्यात आले. त्यांना बल्लभगढला उतरू
दिले गेले नाही. त्यांना गाडीच्या बाहेर ढकलून देण्यात आले. नंतर काही लोकांना ते
सापडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
हा जातीयवादी भावनेनी
प्रेरित गुन्हा हेच दर्शवतोय की भाजप-आरएसएसच्या राजवटीत जातीयवादी ह्ल्ले वाढत चालले
आहेत. याआधी देखील ट्रेन्समध्ये मुसलमानांवर असे हिंसक हल्ले झालेले आहेत, पण शासनाने
देशाचा कायदा अंमलात आणण्याचा कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे अशा जातीयवादी
घृणेमधून झालेल्या गुन्ह्यांना उत्तेजनच मिळाले आहे.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष
(मार्क्सवादी)च्या पॉलिट ब्युरो सदस्य बृंदा कारत, आणि खासदार मोहम्मद सलीम व
दिल्लीच्या सचिवमंडळ सदस्य आशा शर्मा यांनी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये ह्या बाधित
कुटुंबाची भेट घेतली. सरकारने आणि विशेषत:
पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी या हल्ल्याबाबत मौन बाळगले आहे आणि या कुटुंबाची
भेट घेण्यासाठी एकाही अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली नाही हे अतिशय लाजीरवाणे व
निषेधार्ह आहे.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष
(मार्क्सवादी) दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहे. बाधित कुटुंबाला योग्य
नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी देखील मागणी करीत आहे. जातीयवादी भावनेतून
होणाऱ्या, विशेषत: अशा
सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध तीव्र निषेधाच्या कृती करण्याचे आवाहन करीत
आहे.
http://cpim.org/pressbriefs/communal-attack-condemned
http://cpim.org/pressbriefs/communal-attack-condemned
Comments
Post a Comment