महाराष्ट्रातील शेतकरी संप- किसान क्रांती मोर्चाची रोजनिशी
३१ मे २०१७
🌱महाराष्ट्र राज्य किसान सभा🌱
प्रिय कॉम्रेड्स
💥उद्या एक जून पासून शेतकरी संपावर जात आहेत.
💥शहरांना होणारा शेतीमाल व दुधाचा पुरवठा रोखून शेतकरी संप करत आहेत.
💥किसान सभेने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
💥राज्य स्तरावर या संपात आपला मध्यवर्ती हस्तक्षेप आहे.
💥जिल्हा स्तरावर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना व शेतकरी संघटनांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घ्यावा व प्रत्यक्ष कृतीतही आपण अग्रभागी राहावे ही विनंती.
🙏आपलेच🙏
🌱डॉ अशोक ढवळे 🌱आ.जे.पी.गावित
🌱किसन गुजर🌱अर्जुन आडे
🌱डॉ अजित नवले
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ जून २०१७
संपुर्ण राज्यातील शेतकरी आज संपावर गेले आहेत.आज अकोले तालुक्यात कोल्हार - घोटी महामार्गावर रस्तारोको करुन सरकारचा निषेध केलाय.तब्बल तीन तास हा रस्तारोको सुरु होता.रस्तारोको संपल्यानंतर सर्व पक्षीय नेते, शेतकरी यांनी बैठक घेऊन पाच तारखेला अकोले तहसील कार्यालय बेमुदत ताब्यात घेण्याचा निर्णय झालाय..२५००० हजार शेतकरी एकत्र येऊन हा ताबा मिळवणार आहे.राज्यातील सर्व शेतकर्यांनी प्रत्येक तहसील कार्यालय ताब्यात घ्या असे आव्हान अहमदनगर जिल्हातील अकोलेतील शेतकरी करीत आहे.
बाईट - काॅ.डाॅ.अजित नवले
प्रतिनिधी - गणेश आवारी ( अकोले,शिर्डी )8805575474
कर्जमाफ़ी व् शेती मालाला हमी भाव, स्वामीनाथन समितीच्या शिफारशीच्या अंमलबजवाणीची मागण्यांसाठी शेतकरी संपास सिटुचा पाठिंबा!
महाराष्ट्र सीआयटीयु या कामगार संघटनेने 1 जून पासून सुरु झालेल्या शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात व संप लवकरात लवकर मिटवावा अशी मागणी केली आहे.
शेतकरी अडचणीत आहेत व संबंध राज्यभर लोक रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने वेळीच दखल न घेतल्यास राज्यातील कामगार वर्ग शेतकऱ्यांच्या आंदोलनात उडी घेईल असा इशारा सीआयटीयु देत आहे.
डॉ डी एल कराड
राष्ट्रीय उपाध्यक्ष, सीआयटीयु
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ जून २०१७
प्रेस क्लब डाहणूकर हाॅल येथे 2जून रोजी दुपारी 3 वा.काॅ. सीताराम येचूरी यांची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. विषय:महाराष्ट्रातील शेतकर्यांचा संप व देशातील राजकीय घडोमोडी.(शैलेंद्र कांबळे)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ जून २०१७
सातपूर येथे सीटू चे शेतकरी संपाच्या समर्थनार्थ आंदोलन
आज दुपारी सातपूर येथे सी.आय. टी. यु. तर्फे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी डॉ. डी. एल. कराड (राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.आय.टी.यू.)यांच्या उपस्थितीत भर पावसात सातपूर एम.आय.डि.सी. तील कामगारांनी तीव्र निदर्शने करून शेतकऱ्यांच्या संपात सहभाग नोंदविला. त्या वेळी बोलतांना डॉ. डी. एल. कराड (राष्ट्रीय उपाध्यक्ष, सी.आय.टी.यु.)यांनी सांगितले की,
कर्जमाफ़ी व् शेती मालाला उत्पन्नांवर आधारित भाव, स्वामीनाथन समितीच्या शिफारशीच्या अंमल बजवाणी करा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जून पासून पुकारलेल्या संपाला
महाराष्ट्र सी.आय.टी.यु.या कामगार संघटनेने पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात व संप लवकरात लवकर मिटवावा.
शेतकरी अडचणीत आहेत व संबंध राज्यभर लोक रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने वेळीच दखल न घेतल्यास राज्यातील कामगार वर्ग शेतकऱ्यांच्या आंदोलनात उडी घेईल असा इशारा सी.आय.टी.यु. देत आहे.असे डॉ.डी.एल.कराड यांनी आंदोलनाच्या ठिकाणी सांगितले. आंदोलनास कॉ. सीताराम ठोंबरे, कॉ. कल्पना ताई शिंदे, कॉ.शिंदु शार्दूल, कॉ.विनोद पाटील, कॉ.सचिन घाटोळ व असंख्य कामगार उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ जून २०१७
#शेतकरी संपावर
💥राजगुरूनगर, पुणे येथे जबरदस्त आंदोलन शेतकरी नेते व शेतकऱ्यांना अटक
🤙🏿किसान सभा पुणे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे व कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आले आहे.
👊धडाकेबाज संपामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे, म्हणूनच अटक सत्र सुरू आहे.
✊बळीराजाच्या जिवा खातर तुरुंगवास सहन करू.#किसान सभा
जाहीर निषेध निषेध निषेध
💥संपकरी शेतकरी नेते
किसान सभा पुणे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे यांना पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडून मारहाण
💥उद्या दि.२ जून २०१७ रोजी सकाळी ११ वाजता राजगुरूनगर पोलीस स्टेशन समोर निषेध सभा
#किसान सभा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२ जून २०१७
- पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण -
महाराष्ट्रातील शेतकरी संपाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आज २ जून रोजी दुपारी ३ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय किसान सभा इतर शेतकरी संघटनांसोबत या संपात राज्यभर संपूर्ण ताकदीने उतरली आहे. माकप, किसान सभा व सीटू यांचे नेते डॉ अशोक ढवळे, माजी आमदार नरसय्या आडम, आमदार जे पी गावीत, किसन गुजर आणि डॉ अजित नवले हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. या पत्रकार परिषदेसाठी आपल्या लोकप्रिय दैनिकाचे आणि वाहिनीचे प्रतिनिधी अवश्य पाठवावेत ही आवर्जून विनंती -
आपला, डॉ अशोक ढवळे
(केंद्रीय सचिवमंडळ सदस्य, माकप; केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभा)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२ जून २०१७
सिटू महाराष्ट्र राज्य कमिटीचा शेतकरी संपाला सक्रीय पाठिंबा जाहीर
3 जूनला शेतकऱ्यांबरोबर कामगार देखील उतरणार रस्त्यावर
सीआयटीयु ह्या कामगार संघटनेच्या राज्य कमिटीने 1 जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या अभूतपूर्व संपाला सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे. सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड व सरचिटणीस काॅ एम एच शेख यांनी आपल्या सर्व जिल्हा कमिट्या व संलग्न संघटनांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकऱ्यांचा संप दडपण्यासाठी बळाचा वापर करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी 3 जूनला आपली संपूर्ण ताकद रस्त्यावर उतरविण्याचे आवाहन केले आहे. सिटू संपूर्ण कामगार वर्गाला किसान- कामगार एकजुटीचे अभूतपूर्व असे दर्शन घडवून सरकारच्या शेतकरी विरोधी, कामगार विरोधी व जनविरोधी धोरणांविरुद्ध एल्गार पुकारण्याचे आवाहन करीत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३ जून २०१७
शेतकरी संपाला माकपचा पाठिंबा, सीताराम येचुरींची घोषणा
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी संपाला भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही पाठिंबा जाहीर केला आहे. “भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा मिळून आम्ही शेतकरी संपला पाठिंबा देत आहोत.”, अशी माहिती भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली.
भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आखिल भारतीय किसान सभेकडून 5 जूनला महराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यलय ताब्यात घेतलं जाणार आहे आणि यासाठी सोमवारपासून माकप आंदोलनात सक्रीयपणे उतरणार आहे.
“केंद्र सरकारने 3 वर्ष पूर्ण केले. मात्र, त्यांनी जे आश्वासन दिली होती, त्यातली किती आश्वासन पूर्ण केली. याचा विचार सरकारने करायला हवा. शिवाय, उत्पनाच्या दीडपट पैसे देऊन शेतकऱ्याचा माल खरेदी केला जाईल, असं आश्वासनही केंद्र सरकारने दिल होतं. त्याच काय झालं?”, असे सवालही येचुरींनी यावेळी विचारले.
राज्यभरातील शेतकरी संपावर
राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं.
पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता.
हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आवाहन केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३ जून २०१७
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनात मध्यस्थी करण्याची भूमिका जाहीर केली असून त्यावर भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचूरी यांनी अण्णांना चिमटा काढला आहे. 'अण्णांनी आराम करावा. तब्येतीची काळजी घ्यावी अन् शेतकऱ्यांना आंदोलन करू द्यावे,' असा सल्ला सीताराम येचूरी यांनी अण्णांना दिला. दरम्यान भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिर भारतीय किसान सभा मिळून आम्ही शेतकरी संपाला पाठिंबा देत आहोत, असेही त्यांनी जाहीर केले.
येचूरी आज मुंबईत माकपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला आले होते. या नंतर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अण्णांना हा टोला लगावला. भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आखिल भारतीय किसान सभेकडून ५ जूनला महराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालये ताब्यात घेतली जाणार आहेत आणि यासाठी सोमवारपासून माकप आंदोलनात सक्रीयपणे उतरणार आहे. केंद्र सरकारने ३ वर्ष पूर्ण केले. मात्र, त्यांनी जे आश्वासने दिली होती, त्यातली किती आश्वासन पूर्ण केली. याचा विचार सरकारने करायला हवा. शिवाय, उत्पनाच्या दीडपट पैसे देऊन शेतकऱ्याचा माल खरेदी केला जाईल, असं आश्वासनही केंद्र सरकारने दिल होतं. त्याच काय झालं?”, असा सवालही त्यांनी केला.
मग उद्योगपतींचे ११ लाख कोटींचे कर्ज कसे माफ होते?
महाराष्ट्रात दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करतात. भाजपा सरकारच्या ३ वर्षाच्या कार्यकाळात ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सर्व आत्महत्या कर्जामुळे झाल्या आहेत. शेतकरी अन्नदाता आहे. हा अन्नदाताच आत्महत्या करता असेल मग देशाची काय हालत असेल? शेतकऱ्यांना भाजपाचे सरकार कर्जमाफी देऊ शकत नाही मग उद्योगपतींची ११ लाख करोडच्या कर्जांना माफी कशी दिली जाते असा सवाल करतानाच भाजपा सरकार सामान्य लोकांचे नसून उद्योगपतींचे असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. औद्योगिक उत्पादन घटले आहे. कृषी उत्पादन २ टक्क्यावर आले आहे. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटाबंदीचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले आहेत, असेही ते म्हणाले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३ जून २०१७
संप बैठकीत झाले काय ?
👉 सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारसी अमलात आणा अशी संपाची मागणी होती.
👉मुख्यमंत्र्यांनी चर्चेत कोणाचे किती मर्यादेपर्यंत कर्ज माफ करणार हे स्पष्ट करण्यास नकार दिला. याबाबत समिती स्थापन करून पुढील चार महिन्यात हे स्पष्ट करू असे सांगितले. कर्ज माफी झालेली नाही. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखविले गेले आहे.
👉स्वामिनाथन समितीची उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या आधारावर किमान आधारभूत भाव देण्याची शिफारस वा तिच्या अन्य कोणत्याही शिफारसी मान्य करण्यात आल्या नाहीत.
👉शेतकऱ्यांना पेन्शन देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
👉दुधाच्या भाववाढीचे गाजरही बेभरवशाचे आहे.
👉असे असताना संप मागे घेऊ नका असे मी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांना वारंवार विनंती करत होतो.
👉आपण पुणतांब्याला ग्रामसभा घेऊ व त्यात निर्णय घेऊ म्हणून विनंती करत होतो. संप मागे घेऊ नका, किमान आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व शेतकरी नेत्यांना व संघटनांना तरी विश्वासात घ्या, असे मी जीव काढून सांगत होतो.
👉पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत व शिष्टमंडळामध्ये अगोदरच सर्व ठरले असल्याची जाणीव बैठकीत होत होती.
👉सर्व अगोदरच ठरले असल्याने माझे कोणीही ऐकले नाही.
👉सबब पहाटे 3.45 वाजता किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ अशोक ढवळे यांच्याशी फोनवर चर्चा करून मी वर्षा बंगल्यातून बाहेर पडत मीडियाला सामोरे गेलो.
👉झालेली तडजोड किसान सभेला मान्य नसल्याचे आणि महाराष्ट्रातील लढाऊ शेतकऱ्याच्या या ऐतिहासिक संपलढ्याशी विश्वासघात असल्याचे प्रेसला अगोदर जाहीर केले.
👉त्यानंतर शिष्टमंडळ व मुख्यमंत्र्यांनी संप मागे घेतल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मी त्या पत्रकार परिषदेत सामील झालो नाही.
👉 काहीच पदरात पडले नसताना संप मागे घेऊ नये असे किसान सभेचे ठाम मत आहे.
डॉ अजित नवले
राज्य सरचिटणीस
किसान सभा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३ जून २०१७
फक्त पूणतांब्याच्या शेतकर्यानां बोलावून मुख्यमंत्र्यानी बंद द्वार चर्चा केली ... ती चर्चा सुद्धा रात्री केली ... तसेच कोणत्याही ठोस मागण्या मंजूर न करता संप मागे घेतल्याच्या बातम्या फक्त आणि फक्त पूणतांब्याच्या शेतकर्यांकडून घोषणा आपल्या मिडियाच्या जातभाईकडून करून घेतली ... मुख्यमंत्र्याच्या चेहर्यावरील आसुरी आनन्द शेतकर्यानां कस फसवल हे जाहीर करत होत ... आत्ता 70% मागण्या मान्य ही बातमी कशी फसवी आहे....👇
वाचा आणि विचार करा ...?
फक्त 2/4 लोकानां हाताशी धरून संप मिटल्याची घोषणा कशी.....?
फक्त पूणतांब्याचे शेतकरी चर्चेला...?
कोणी निवडलं शिष्टमंडळ....?
काय निकष लावून प्रतिनिधी निवडले... ?
रात्री 12 ते 4 बंद खोलीत कसली चर्चा झाली..... ?
चर्चेचा तपशील बाहेर का नाही जगजाहिर करत ...?
कोणत्या मागण्या मान्य झाल्या याबाबत सगळा संभ्रम आहे....?
हमीभावापेक्षा कमी भाव दिल्यास व्यापार्यावर गुन्हे ... हा हास्यास्पद प्रकार कसा शक्य आहे...?
फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी, ते ही तत्वत:.... 31 ऑक्टोबर पर्यन्त....?
ते ही अभ्यास करून ठरवू अशी माहिती मिळतेय.
मग संप मिटलाच कसा...?
70% 80% मागण्या मान्य हा कोणता प्रकार...?
80% मागण्या मान्य अशी पुडी सोडली जातेय...?.
स्वामिनाथन आयोग लागू करु... अस फक्त फसव आश्वासन... ? जस 2014 च्या निवडणुकीत दिल तस...?
मित्रानों आपणास जाहीर विनंती ... पूणतांब्याचे शेतकरी म्हणजे सर्व काही बरोबर अस नाही ... संप सुरूच राहणार ...👊
स्वतः च अतोनात नुकसान करून घेऊन ऐतिहासिक संप घडवून आणणाऱ्या शेतकऱ्यांसोबत धोका होऊ नये यासाठी ... संप सुरूच राहणार...नाहीतर माणुसकी व चांगल्या मूल्यांवरचा विश्वास शेतकऱ्यांचा कायमचा उडेल....👊
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३ जून २०१७
ब्रेकिंग न्युज.....पार्डी फाटा....ता. बुम जि .ऊस्मानाबाद येथे आताच शेतकर्यांनी कर्जमाफीबद्दल विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकर्यांवर लाठीहल्ल्याचे आदेश.............हे सरकार लवकर मरणार ......
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३ जून २०१७
ब्रेकींग न्यूज :
जयाजी सुर्यवंशी व संजय गिद्दे यांना बोलावून संप मागे घ्यायला लावायची हा सरकारचा संपाआधीच आखलेला कट हे सिद्ध 😳😳😳😠😠😠
जयाजी सुर्यवंशी : तथाकथित शेतकरी नेता. मात्र मुळ आरएसएस चे . अडीच वर्षापूर्वी पैठण येथे भाजपा कडे उमेदवारीची मागणी .
संजय गिद्दे :
सरकारचे वतीने आंदोलनांत फूट पाडण्याचा हातखंडा. कृषी प्रदर्शन ईव्हेंट व्यायसायिक. मराठा मोर्चाचे वेळी कोल्हापूरला फूट पाडतांना सापडला व येथेच्छ मार खाल्लेला कुटील शकुनी .
पहा हे सरकारचे खरे धंदे.
😡😡😡
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४ जून २०१७
जयाजी सुर्यवंशी उत्तर द्या...
१) मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवताना कलेक्टरांमार्फत निरोप पोहचवला होता का?
२) कोअर कमिटी स्वखर्चाने मुंबईला गेली होती, का मुख्यमंत्र्यांनी खास व्यवस्था केली होती?
३) संध्याकाळी ऊशीरा बैठक असल्यामुळे घरुन जाताना भाजीभाकरी नेली होती, का "वर्षावर" शेतकर्यांचे पिंड पुजुन भरपेट जेवलात?
४) बैठकीदरम्यान कितीवेळा पुलतांब्यातील शेतकर्यांना किंवा महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना फोन केला होता?
५) संपाची सुरुवात पुलतांब्यातुन झाली होती मग संप मागे घेण्याचा निर्णय पुलतांब्यात येऊन का जाहीर केला नाही?
६) पहाटे ३ वाजता शेतकरी गाढ झोपेत असताना संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करताना थोडीतरी लाज वाटली का?
७) २१ जणांच्या कोअर कमिटीपैकी फक्त १२ लोक बैठकीला हजर होते, त्यातल्याही ५ सदस्यांनी संप मागे घेण्याला नकार दिला होता मग केवळ ७ जनांच्या समाधानासाठी ७ कोटी शेतकर्यांच्या भावनांशी का खेळलात?
८) पत्रकार परीषदेनंतर कोअर कमिटीचे सदस्य झोपायला कोठे गेले? पुलतांब्याला तातडीने किती सदस्य माघारी आले?
९) मिटींग रात्री न घेता दिवसा घ्यावी अशी विनंती तुम्ही मुख्यमंत्र्यांना केली होती का?
१०) संप पाठीमागे घेण्याचे लगेच जाहीर करण्यापुर्वी तुम्ही शेतकर्यांशी एकदा बोलणे अपेक्षीत होते, आज संभ्रमाच्या स्थितीत जो आक्रोश चाललाय याची जबाबदारी तुम्ही घेणार का?
*ज्या तत्परतेने संप मागे घेवुन सरकारची कोंडी फोडलीत त्याच तत्परतेने या प्रश्नांची उत्तरे देऊन शेतकर्यांच्या मनातली तुमच्याबद्दलची कोंडी फोडावी ही विनंती...*
( मित्रांनो ही पोस्ट शक्य तेवढी पुढे पाठवा, जयाजी सुर्यवंशी जिथे कुठे असतील तिथे प्रत्येक शेतकर्याने त्यांना हे प्रश्न विचारुन उत्तर मिळवले पाहीजे मग समजेल या कटकारस्थानामागे नक्की कोण आहे...plz forward )
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४ जून २०१७
👉शेतकरी संप पुढे नेण्यासाठी आगामी दोन दिवसाचा कार्यक्रम
👉दि 4 जून रोजी नाशिक येथे 4 वाजता बैठक. मी येणार आहे आपणही यावे.
👉दि 5 रोजी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. बंद ला जाहीर पाठिंबा देत आहे. पूर्ण ताकतीने सामील होणार आहे.
👉दि 5 रोजी ज्या पूणतांबा येथे संपाची पहिली ग्रामसभा झाली तेथे आत्मक्लेश करीत महाराष्ट्र बंदला पाठिंबा व्यक्त करणार.
डॉ. अजित नवले
राज्य सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य किसान सभा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४ जून २०१७-
जुन्नर
ओतूरच्या पिंपरी पेंढारजवळ झेड दर्जाची सुरक्षा दिलेला दुधाचा टँकर शेतकऱ्यांनी अडवला. यावेळी एक वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शेतकऱ्यांना 'भेकड' म्हटली. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आलीय. टँकरच्या चाकातील हवा शेतकऱ्यांनी सोडून दिलीय. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केलाय. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीय. आता तर शेतकरी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. महाराष्ट्र पेटतोय...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
शेतकरी संप...मिडियावर दबावतंत्र
असं कानावर येतंय की शेतकरी संपाच्या बातम्यांना फारसे महत्व देऊ नये म्हणून सरकारने आज मेडीयावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही गोष्ट खरी की खोटी माहित नाही. मात्र असे होऊ शकते हे पटण्याजोगे आहे. तसेच सरकार समर्थक गुंड शक्तींकडून देखिल आज एक दोन ठिकाणी media repoters वर शारिरीक हल्ले झाले आहेत.
अशा पद्धतीने संप दडपला जाणार नाही , हा मेसेज इतका फाॅरवर्ड करा की मेडियाला देखिल कळेल की जनता त्यांच्या सोबत आहे...जनता शेतकऱ्यांसोबत आहे, या टरबुज्या सरकारला घाबरण्याचे कारण नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
सगळ्या भारताला जे अन्न मिळते त्याला शेतकऱ्याने सबसिडी दिलेली असते. आता साधे गव्हाचे उदाहरण घ्या त्याचा सध्याचा भाव असायला पाहिजे १०,३००* पण आम्ही तो विकतो १६५० रुपयांना म्हणजे आम्ही तुम्हाला सबसिडी देतो १०,३०० - १६५०= ८६५० रु. ( ८४ %)
(*१९७३ साली गव्हाचा भाव होता ४०० रु. प्रति क्विंटल. ४४ वर्षात दर वर्षी सरासरी ७.७२ % ने महागाई वाढली. या वाढीनुसार २०१७ मध्ये गव्हाचा भाव असायला हवा १०,२९४ (२५.७३ पट) पण तो आहे फक्त १६५० (४.१२५ पट) ! )
#शेतकरीसंप #शेतकरी_संप #शेतकरी_संपावर #शेतकरीसंपावर
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
सर्व नागरिक/ कॉमरेड्स यांना कळविण्यात येते की, कर्जमुक्ती व् शेती मलाला स्वामीनाथन समिति शिफारशिनुसार भाव या मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत, शेतकऱ्याचा संप किसानसभेने अधिक तीव्र करण्यासाठी ५ जून १७ ला राज्यात आक्रमक अंदोलनाची हाक दिली आहे.त्यांच्या कृतीत प्रत्येक जिल्ह्यात सीटूने सक्रिय सहभागी व्हावे.असे आवाहन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्यअध्यक्ष-डॉ.डी.एल.कराड, व राज्यमहासचिव अड़.कॉ एम् एच शेख यांनी केले आहे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
आज सकाळी 7 वाजता शेकडो शेतकरी व सामान्य जनतेचा सीटू व किसान सभा द्वारे आयोजित जनसभे मधे सहभाग जालना कृषि मार्केट मधे.
आज जालना मार्केट बंद करण्यासाठी सकाळी 6 वाजताच तैयारी झाली...प्रतिसाद उत्तम मिळाला
हे मार्केट सकाळी 8 वाजेपर्यंतच असत जे बंद करण्यासाठी सहभाग उत्तम राहला
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती,जाधवमंडी कडकडीत बंद.
#शेतकरी_संपावर #संप_चालूच
आज जालना मार्केट बंद करण्यासाठी सकाळी 6 वाजताच तैयारी झाली...प्रतिसाद उत्तम मिळाला
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शहरातील कामगार,विद्यार्थी, कन्स्ट्रक्शन साईटवरील कामगार, हॉटेलातील वेटर, दुकानातील कामगार,सर्व आस्थापनातील ,ऑफिसमधील शिपाई , सफाई ( हाऊसकिपींग ) कामगार , धुणं भांडी करणाऱ्या बायका , सर्व कंपन्या ,ऑफिसमधील लेबर , यांची एकजूट शहरातील शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलामुलींनी ( इंजिनिअर, डॉक्टर, वकील, अधिकारी, इ कुणीही असो त्यांनी सर्वांनी ) वरील सर्वांची एकजूट करून ..... आपापल्या ऑफिसात संप करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा , आपल्या मायबाप शेतकऱ्याला पाठिंबा द्यावा
५, ६,७ तारखेच्या बंद, ताळेबंद हे केवळ ग्रामीण भागात न होता शहरातही व्हावं आणि आपल्या मायबाप शेतकऱ्याचं मागणं पूर्ण व्हावं ...... शहरातल्या कामगारांनी जर शेतकऱ्याला अशी साथ दिली तर उद्या कंपन्यांमधील कंत्राटीकरण, वेतनवाढ, कामातील सुरक्षा , पेन्शन या गोष्टींसाठी शेतकरीपण शहरातल्या कामगाराबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहिल्याशिवाय नाही
दयानंद गायकवाड यांच्या FB वॉलवरुन साभार...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकरी संपाला का पाठिंबा दिला पाहिजे????
शहरातील काही लोक सध्या सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांची थट्टा करत आहेत.शेतकऱ्यांवर टीका करत आहेत. त्यांना वाटते की शहरातील आपल्या नोकऱ्या/उद्योगधंदे एकदम सुरक्षित आहेत. पण लवकरच शहरातील लोकांची अवस्था शेतकाऱ्यांपेक्षाही वाईट होणार आहे.कारण world bank च्या एका अभ्यासानुसार येत्या १० वर्षांत भारतात यांत्रिकीकरणामुळे ६९% नोकऱ्या नष्ट होणार आहेत.कल्पना करा जर असे झाले तर शहरातील लोकांची काय अवस्था असेल.त्यामुळे आज शेतकरी ज्या परिस्थितीतून जात आहे त्यापेक्षा वाईट अवस्था शहरातील लोकांची असणार.
एक काळ होता की I.T. क्षेत्रातील व्हाइट कॉलर लोक इतर क्षेत्रातील trade union ला विरोध करायचे.Trade union उद्योगधंद्यांच्या विकासात अडसर असतात असे त्यांचे मत होते.देशात चालणाऱ्या शेतकरी /कामगारांच्या चळवळींची ते मस्करी करायचे. आपली IT क्षेत्रातील नोकरी एकदम सुरक्षित आहे आणि आपण निवृत्त होईपर्यंत दरवर्षी आपल्याला किमान १०% वेतनवाढ मिळत राहणार असा त्यांचा भ्रम होता. पण गेल्या काही महिन्यांपासून IT क्षेत्राला मंदीचा फटका बसू लागला आहे.या क्षेत्रात आता नोकर कपातील सुरवात झाली आहे आणि एकेकाळी union ला विरोध करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या वाचवण्यासाठी union ची गरज वाटू लागली.हल्लीच त्यांनी The Forum for Information Technology Employees (FITE) या trade union ची स्थापन केली आहे. union शिवाय आता पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आहे आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी ,कामगार आणि शहरातील सर्व लोकांनी एकजूट करून एकमेकाला सहाय्य करणे आवश्यक आहे.
म्हणून माझा शेतकरी संपला पाठिंबा आहे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------.
५ जून २०१७
शेतकरी संपासाठी २१ शेतकरी नेत्यांची नवीन सुकाणू समिती
डॉ. अजित नवले, खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, मा. रघुनाथदादा पाटील, मा. संतोष वाडेकर, मा. राजू देसले, मा. संजय पाटील, मा. प्रहार, मा. विजय जवंधिया, मा. गणेश काका जगताप, मा. चंद्रकांत बनकर, मा. शिवाजी नाना नानखिले, डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. गिरीधर पाटील, मा. गणेश कदम, मा. एकनाथ बनकर, मा. करण गायकर, मा. हंसराज वडघुले, मा. अनिल धनवट
आम्ही आपल्या सोबत आहोत.
#शेतकरी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
आखिल भारतीय किसानसभा माहुर तालुका कमीटीच्या वतीने आज दि. 05/06/ 2017 रोजी माहुर तहसील कार्यालयास घेराव घालण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व. काॅ.मनोज किर्तने,काॅ. किशोर पवार, काॅ. शंकर सिडाम, काॅ दिलीप गवळी, कैलास भरणे, राजकुमार पडलवार राजु राठोड व ईतर.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोळवलकरनीती आणि शेतकरी संप (एका षडयंत्राचा गौप्यस्फोट )
जयाजी सूर्यवंशी हे नाव शेतकरी संपाच्या मुख्यमंत्री यांच्या सोबतच्या मध्यस्थी नंतर जास्त प्रसिद्ध झाले तरी त्याच्या दोन वर्ष अगोदर पासून ते वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवर दिसत होते. एखादया शेतकरी नेत्यांना वृत्तवाहिन्यांवर एवढा मोठा स्पेस मिळणे कठीण असते पण जयाजी सूर्यवंशी यांना तो मिळत होता. कारण त्यांना तो स्पेस कोणीतरी मिळवून देत होते. कोण मिळवून देतेय हे शोधण्यासाठी जयाजी यांच्या कुटुंबाच्या इतिहासात जावे लागेल.
जयाजी अण्णासाहेब सूर्यवंशी पाटील हे त्यांचे पूर्ण नाव. अण्णासाहेब पाटील यांचे बंधू माणिकराव पाटील....माणिकराव पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खुद्द संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्याकडूनच संघ स्वयंसेवकाची प्रतिज्ञा घेतलेली होती. नगर येथे वकिली करतानाच सुरुवातीच्या काळात स्वयंसेवक, नंतर जिल्हा संघचालक, महाराष्ट्राचे प्रांत संघचालक, पश्चिम विभागाचे (महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात) संघचालक अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती . जयाजी सूर्यवंशी हे माणिकराव पाटील यांचे पुतणे लहानपणा पासून संघाचे बाळकडू त्यांना मिळालेले आहे. अशा संघनिष्ट कुटुंबातून आलेले जयाजी सूर्यवंशी हे औरंगाबाद येथे झालेल्या देवगिरी प्रांताच्या स्वयंसेवकाच्या मेळाव्यास अर्ध्या चड्डीत हजर होते पण ते का हजर होते या बद्दल कोणी खोलात गेले नव्हते. पण थोडे पाळेमुळे खोदली कि हि माहिती भेटली.
गोळवलकर गुरुजींचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून हि माणिकराव पाटील यांची ओळख आहे. त्या गोळवलकर गुरुजींची शिकवण होती कि वेगवेगळ्या वर्गाच्या आदोलनात संघाच्या माणसांनी घुसले पाहिजे आणि ती आंदोलने ताब्यात घेऊन संघाला पूरक असणारी भूमिका वठवली गेली पाहिजे.
गोळवलकर यांच्या या शिकवणीच्या तत्वावर जयाजी सूर्यवंशी याना शेतकरी चळवळीत घुसवले आहे. शेतकऱ्यांचा निर्माण होणारा मोठा असंतोष आणि आक्रोश हा जयाजी सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली चर्चा करून शमवला. येथे गोळवलकर नीती कामी आली.
पण हे वास्तव आता शेतकऱ्यांच्या सर्व जनतेच्या समोर येणे आवश्यक आहे. हे वास्तव समोर आले तर शेतकरी यांना नक्कीच गाडून टाकेल. जयाजी सूर्यवंशी हे जातीने जरी कोणीही असले तरी ते जन्मजात संघी आहेत. त्यांना हि शेतकरी चळवळ संपवता येणार नाही. भाजपाला वाटते कि ते गोळवलकरच्या कूटकारस्थानाने वेगवेगळ्या चळवळी ताब्यात घेतील पण त्यांना आता ते शक्य होणार नाही. कारण आता आमच्या सारखी शेतकऱ्यांची पोर त्यांची व्यवस्थित कुंडली समजून घेऊन वेळीच जनतेच्या समोर उघडी करत आहेत.
शेतकऱ्यांचा आक्रोश हा तुम्हाला आमच्या मागण्या मान्य करूनच शांत करावा लागेल कटकारस्थान करून तो शांत होणार नाही.
हि माहिती सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचावा संघाचे षडयंत्र उघडे पडलेच पाहिजे. तोतया शेतकरी नेत्याचा पर्दाफाश झालाच पाहिजे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकर्यांसाठी लातूर बंद, एसटी बंद, रास्ता रोको, चक्का जाम, व्यापार ठप्प, ३४ जणांना अटक
लातूर (आलानेप्र): शेतकर्यांच्या हाकेला साद देत आज लातूर जिल्ह्याने आपली आस्था दाखवून दिली. लातुरसह जिल्हाभर बंद पाळण्यात आला. व्यापार आणि प्रवासी वाहतूक थांबली, चक्का जाम झाला, रस्ते अडवले गेले, बाजार समित्या बंद राहिल्या. शेतकर्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न शेतकर्यांनी हाणून पाडला असा दावा आयोजकांनी केला. लातूर शहरातील गंजगोलाई, कापड लाईन, सुभाष चौक, हनुमान चौक, गांधी मार्केट आदी परिसरात फिरुन कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. अशाच पद्धतीने राजीव गांधी चौकापासून गांधी चौकापर्यंत छावाच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील व्यापार आधीच बंद होता. कार्यकर्त्यांच्या आवाहनांमुळे छोटे मोठे व्यवसायही बंद झाले. शहराच्या चारही प्रमुख मार्गावरुन आलेले कार्यकर्त्यांचे जत्थे बसस्थानकाजवळ जमले. बसस्थानकातील उद्घोषणेचा माईक उदय गवारे यांनी ताब्यात घेतला. आज एसटी थांबणे का गरजेचे आहे हे त्यांनी सांगितले. सुमारे दोन तास बसेस जागीच थांबून राहिल्या. या कार्यकर्त्यांनी बसस्थानकात शेतकर्यांचा उदघोष करीत समोरच्या मुख्य रस्त्याचा ताबा घेतला. या ठिकाणी बराच काळ रास्ता रोको झाला.
या आंदोलनाच्या निमित्ताने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक होती. रास्ता रोको करणार्या ३४ कार्यकर्त्यांना गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. यात प्रा. विठ्ठल मोरे, उदय गवारे, प्रदीप गंगणे, माधव गंभीरे, विजयकुमार घाडगे, ओमप्रकाश आर्य, भगवान माकणे, राजाभाऊ गुंजरगे, एकनाथ कवठेकर, भालचंद्र कवठेकर, सुभाष देशमुख, सतीश देशमुख, दत्ता माळी, किसन कदम, अजय कलशेट्टी, सोनू डगवाले, चंदू बगडे, अमरदीप शिंदे, सुधाकर शिंदे, राजकुमार शिंदे, विलास सोळुंके, बालाजी निकम, प्रकाश गुळवे, शिवाजी गुळवे, किसन मस्के, सुनील बोंडगे, योगेश शिंदे, विठ्ठल सूर्यवंशी, प्रताप उफाडे, उद्धव शिंदे, गणपत शिंदे, दत्तू टिके, प्रमानंद वीरगावे, विक्रम गिरी, विजय जाधव, अनिल जाधव, राहूल मुळे, अमरदीप सपाटे, अमोल जाधव, बाळासाहेब सपाटे, अजय गुंजाळे यांचा समावेश होता.
किसान क्रांती, छावा, शेतकरी संघटना, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, माकप यासह अनेक पक्ष-संघटनांनी केलेलं हे आंदोलन शांततामय मार्गाने झालं. शेतकर्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न शेतकर्यांनी हाणून पाडला हे या आंदोलनाच्या यशातून स्पष्ट होते असे प्रा. विठ्ठल मोरे यांनी सांगितले. शेतकर्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या या मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनाही राज्यभर फिरु देणार नाही असा इशारा उदय गवारे यांनी दिला.
कॉ विठ्ठल मोरे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काॅ अजित नवले आणि किसान सभेच्या सर्व नेत्यांच्या वर्षानुवर्षांच्या कष्टाला शेवटी न्याय मिळाला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विजय आता निश्चित.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
05/06 4:49 pm
Joy Xavier: " LICAOI " Maharashtra State
Committee Extends It's
Solidarity Support To The
Historic Peasantry Strike
Led " AIKS " Maharashtra
From 1st June 2017 To 10th
June 2017.
Workers & Peasants Unity
Z I N D A B A D
Revolutionary Greetings To
All Striking Peasants Of
Maharashtra State.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
दि . 5/6/2016 सोमवार रोजी सुरगाणा तालुका किसान सभा यांच्या वतीने किसान क्रांती मोर्चा च्या अभूतपूर्व बंदला पाठिंबा व सुरगाणा तालुका कडकडीत बंद करून सुरगाणा तालुक्यातील शेतकर्यानि (भाजपा) सरकारवर आपला रोष व्यक्त केला
💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽 💪🏽💪🏽💪🏽
🌹बंदचे नेतृत्व यांनी केले 🌹
1) काॅ. आ. जे.पी. गावीत
2) काॅ. सावळीराम पवार
3) काॅ. शुभाष चौधरी
4) काॅ. इंद्रजित गावीत
5) काॅ. भिका राठोड
6) काॅ. राजु शेख
7) काॅ. अकिल पठाण
8) काॅ. चिंता गवळी
7)काॅ. मनिषा महाले
8) काॅ. चंद्रकला भोये
आदि कार्यकर्तानि सुरगाणा तालुका कडकडीत बंद केला.
काॅ. सुभाष चौधरी
ता. सेक्रेटरी मा.क.प - सुरगाणा
संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी अन्दोलनाने पेटून उठला आहे.त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.ह्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज DYFI व किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहशील वर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला .ह्या अन्दोलनाचे नेतृत्व DYFI जिल्हा सेक्रेटरी योगेश अहिरे,चेतन गांगुर्दे,वसन्त गांगोडे,समधान सोमासे,सोमनाथ खिल्लारी ,सोमनाथ कडाले,पंकज अस्वले,हे कार्यकर्ते करत होते
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता संपणार नाय, संप करणार....
शेतकऱ्यांचे झुंजार नेते किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आम्ही आपल्या सोबत आहोत.
#एक शेतकरी
लोमटे नगरात पालकमंत्र्यांची 'वाॅर रुम'
नाशिक- मिटणार म्हणता, म्हणता कालपासून चिघळलेला शेतकरी संपा हाताळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांच्या सहाय्याने नाशिकच्या लोमटे नगरमध्ये चक्क वाॅर रुम केली आहे. विविध शासकीय विभाग त्यासाठी इनपुट देत आहेत. नाशिकवर त्यासाठी खास लक्ष ठेवले जात असून पालकमंत्री गिरीष महाजन फारसे नजरेत न येता एका खाजगी फ्लॅट मधून नाशिकची मिनीटामिनीटांची माहिती मुख्यमंत्र्यांना देत आहेत.
शनिवारी संप मिटल्याची घोषणा मुख्यमंत्री व किसान क्रांती मोर्चाच्या काही नेत्यांनी केल्यावर राज्सय शासन व मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर मात केल्याच्या समाधानत नेहेमीप्रमाणे त्यांची बाॅडीलॅंग्वेज आक्रमक झाली होती. मात्र, यावर उमटलेल्या प्रतिक्रीयांनी हे समाधान दोन तासही टिकले नाही. त्याबाबत सर्वाधिक आक्रमक प्रतिक्रीया नाशिकमधून आल्य़ा. त्याबाबत बाजार समितीत झालेल्या बैठकीस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संप सुरुच ठेवण्याची घोषणा केल्याने पालकमंत्री गिरीश महाजन दुपारी नाशिकला दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आंदोलनात शेतकरी नव्हे तर सराईत गुन्हेगार आहेत असे त्यांनी जाहीर केले.
काय बोलायचे याचे 'प्राॅम्पटिंग' त्यांना मुख्यमंत्र्यांनी केले होते. खुद्द पालकमंत्र्यांनीच ते सांगितले. अगदी तशीच 'लाईन' महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला घेतल्याने त्यावर शिक्कामोर्तबच झाले. तत्पूर्वी सबंध माहिती विभाग शुक्रवारी सक्रीय करुन पत्रकारांकडे संपाबाबत चाचपणी करण्यात आली.
संप समर्थक नेत्यांनाही सरकारमधीलच काही यंत्रणा त्याचे 'इनपुट' देत असल्याने नाशिकमधून संपाची सूत्रे हलविली जात आहेत. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी, आमदार, खासदारांना संपक-यांनी लांब ठेवले आहे. संपाबाबत काय करणार, सुकाणु समितीचे सदस्य, बैठक कुठे, केव्हा, पुढची दिशा याबाबत काहीही वाच्यता या नेत्यांनी केलेली नाही. त्यावर जाणीवपूर्वक मौन बाळगले जात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय विश्रामगृहावर मुक्काम केल्यास त्याची माहिती कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरीक व विरोधकांनाही होते. त्यामुळे लोमटे नगर भागातील एका अलिशान फ्लॅटमधून ते संपावर लक्ष ठेऊन आहेत.
मंत्र्यांनी त्याबाबत खास पोलिस अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. अगदी पोलिस शिपाई देखील मोबाईलवर सर्व चित्रीकरण करतात. एका कार्यक्रमाचे वेगवेगळ्या अँगलने चित्रीकरण करुन त्यात कोण आहे याचे टिपण केले जाते. कोणती वाहने आली याच्याही नोंदी घेतल्या जातात. त्यानंतर त्यांच्याशी थेट संपर्क साधला जातो. त्यामुळे सगळेच संपाच्या धोरण व कृतीबाबत सगळेच गोपनियता बाळगत आहे.
मुख्यमंत्री मात्र क्षणाक्षणाचे 'हायलाईटस्' घेत आहेत. त्यासाठी त्यांनी वर्षावर काही विश्र्वासु सहकारी व कर्मचारी नेमूण वाॅर रुम निर्माण केली आहे. येत्या दोन-चार दिवसांत शेतकरी दमतील, पाऊस सुरु होईल व संप थंडावेल असा गोपनिय अहवाल पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे कळते. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या संपात आता रघुनाथदादा पाटील, बुधाजीराव मुळीक, डाॅ गिरधर पाटील, हंसराज वडघुले, राजू देसले, डाॅ. अजित नवले आदींसह शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मराठा महासंघ, छावा, किसान सभा, आयटक यांसह विविध बिगर राजकीय संघटना अग्रभागी आहेत. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, माकप, सीटू आदी राजकीय पक्षांनी त्याला पाठींबा दिल्याने त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तळेगांव येथे शेतकऱ्यांचा संप तीव्र झालाय..
तळेगांव कडून मुंबई कडे जाणाऱ्या टोल नाका पेटवून देण्यात आला व गाड्यांची तोड़फोड़ करण्यात आली...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज 5 जुन रोजी शेतकऱ्यांच्या संपास व आंदोलनास सीआयटीयु कामगार संघटनेच्या वतीने कॉ सिताराम ठोंबरे यांच्या नेतृत्वात् जाहिर पाठिंबा दिला. रिलायंस पेट्रोल पंप चौक सातपुर आणि आनंद आय पॉवर कंपनीच्या जवळ जोरदार घोषणा देवुन आंदोलन करण्यात आले, यावेळी कॉ सिताराम ठोंबरे,सतीश खैरनार,गौतम कोंगळे,सनेर,विनोद पाटिल,गणेश जाधव,पंकज कुलकर्णी,भरत कोलंबे,नितिन चौधरी,त्रिपाठी,गुलाब सूर्यवंशी,पोपट वाघ सह विविध कंपन्यातील कामगार सहभागी झाले होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
💥 महाराष्ट्राच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व किसान सभेला मिळालंय ,
हि देखील आपल्या दृष्टीने ऐतिहासिक गोष्ट आहे ....
💥 शरद जोशीनंतर पहिल्यांदाच एक स्पष्ट विचारधारा शेतकरी चळवळीला मिळेल अशी शक्यता व संधी आता आहे ......
लाल सलाम कॉम्रेड्स ...! ✊🏿✊🏿
डॉ संजय दाभाडे
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वामीनाथन आयोग व शिफारसी...Swaminathan Committee report.
काय आहे स्वामिनाथन आयोग ? शेतकरी का मागतो हा आयोग ? शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पैकी एक मागणी आहे , कि स्वामिनाथन आयोग लागु करण्यात यावा. या विषयी कृपया काळजी पूर्वक वाचा... उद्या शेतकऱ्यांना याच मुद्यावर लढाई जिंकायची आहे. शेतकरीहीतार्थ...
👉�आयोगाच्या अहवालातील काही शिफारशी याप्रमाणे...
⛳ शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे.
⛳ शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा.
⛳ शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी.
⛳ बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्याचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी.
⛳ आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा.
⛳ दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी.
⛳ कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा.
⛳ पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा.
⛳ हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये , नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती येईपर्यंत गैरस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे.
⛳ हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये , नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती येईपर्यंत गैरस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे.
⛳संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी.
⛳ पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक च्या एवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे.
⛳सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी.
⛳परवडणार्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी.
⛳ संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन...
⛳ शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात.
अधिकाधीक लोकांपर्यंत पोहचवा....
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
*जसे स्वातंत्र्य काळात कम्युनिस्ट नेत्यांनी चळवळीची धुरा सांभाळून कठिन काळात देशाला स्वप्नवत् असलेले स्वातंत्र्य मिळउन दिले*
*तसेच आता निर्माण झालेल्या कठिन काळात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कम्युनिस्ट नेते परत पुढे येत इतर संघटना व् त्यांच्या नेत्यांना सोबत घेत नवी क्रांति करण्यासाठी तैयार झालेत*
*शेतकऱ्यांची नव्या कोअर कमिटीची स्थापना*
१..कॉमरेड अजित नवले (कमिटीेेचे निमंञक)
२..राजु शेट्टी (राज्य समन्वयक)
३..बच्चु कडु (राज्य समन्वयक)
४..रघुनाथदादा पाटील (राज्य समन्वयक)
५..विजय जावंधि (राज्य समन्वयक)
६..अनिल घनवट (राज्य समन्वयक)
७..संजय पाटील (राज्य समन्वयक)
८..संतोष वाडेकर (राज्य समन्वयक)
९..नामदेव गावडे (राज्य समन्वयक)
१०..गणेश जगताप (राज्य समन्वयक)
११..करण गायकर (राज्य समन्वयक)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
करमाळा- महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने करमाळा बंदचे आवाहन करताना शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. या दरम्यान विनोद कुकडे व अन्य शेतकरी जखमी झाले.
पोलिसांनी लाज सोडलीय का?
#शेतकरीसंपावर
#संपचालूच
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
5th June 2017
Historical Farmers Struggle in Maharashtra
The Maharashtra Bandh called today June 5 jointly by several peasant organisations, among whom the Maharashtra Rajya Kisan Sabha (AIKS) is playing a leading role, to support the historic statewide Peasant Strike, was a massive success almost all over the state. Big cities had been excluded. Hundreds of towns, mandis, roads, shops, government offices etc were closed down by lakhs of farmers who came on to the streets in solidarity with the burning demands of the strike. The unprecedented Peasant Strike, which began on June 1, with farmers refusing to get their produce like milk, vegetables and fruits to the market, entered its fifth day today. It was further intensified with anger on June 3 due to the shameful act of its betrayal by two blacklegs who were masquerading as peasant leaders. It has now come to light, not surprisingly, that both these self-styled leaders - Jayaji Suryavanshi and Sandip Gidde - have old RSS connections. They met the Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in the early hours of June 3 and, in spite of the CM not concretely conceding a single demand of the fighting peasants, they unilaterally declared a withdrawal of the Strike at dawn. It was crystal clear that both the RSS-BJP state government and these blacklegs had connived to undermine this historic struggle of the farmers of Maharashtra. But to their utter misfortune, AIKS State General Secretary, Dr Ajit Nawale, was also a part of the delegation that met the CM. He hotly argued that none of the vital demands like loan waiver, implementation of the Swaminathan Commission recommendation on remunerative prices, pension for peasants and agricultural workers etc were agreed to by the CM and hence the Strike should not be withdrawn. When both the CM and these blacklegs refused to listen to his pleas, he consulted AIKS national joint secretary Dr Ashok Dhawale on phone at 3.45 am on June 3, walked out of the talks in protest and immediately reported the connived betrayal to the media waiting outside the CM's bungalow. This was flashed all over the state and it led to a massive uproar amongst the peasantry against both the government and the blacklegs. On June 2, before these events, CPI (M) general secretary Sitaram Yechury had addressed a packed press meet in Mumbai supporting the Peasant Strike. On June 3 again, Dr Ashok Dhawale, Dr Ajit Nawale, AIKS state president Kisan Gujar and state working president Arjun Adey addressed another packed press meet organised by the AIKS in Mumbai exposing this betrayal and calling for the intensification of the Peasant Strike. Both these press meets were extensively covered by both print and electronic media. AIKS leaders Ashok Dhawale and Ajit Nawale immediately contacted leaders of other peasant organisations who were against this sellout and it was jointly decided to give today's Maharashtra Bandh call. The Peasant Strike will continue with strength and on June 8, a meeting of the new coordination committee that has been formed will meet at Nashik and will decide the future course of struggle. AIKS units throughout Maharashtra are in the thick of the ongoing struggle. All Left and other opposition parties, trade unions like CITU, AITUC and others, AIAWU, AIDWA, SFI and DYFI have been actively supporting the Peasant Strike. The CITU has held demonstrations in several cities as part of its call for worker-peasant unity.
- Dr Ashok Dhawale, Joint Secretary, AIKS
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
🌱घनसावंगी तालुक्यातील सर्व शेतकरी तरुण भावांना अवाहन करण्यात येते की शेतकरी क्रांती मोर्चा कमिटीच्या निर्णयानुसार दि.६जून रोजी वेळ सकाळी ११वा. घनसावंगी तहसिल कार्यालयाला घेरावघालुन तहसिल कार्यालय ताब्यात घ्यायचे आहे या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामिल व्हावे ही विनंती .
🌱शिवबाचा महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभुमी नव्हे,तर न्यायासाठीची युद्धभुमी बनवा......।शेतकरी एकजुटीचा विजय असो..।!
🌱आंदोलनात सामिल होणा-या भावांनी खालील नंबरवर संपर्क साधावा . गोविंद आर्दड मोः-९५०३१७८२०२ सुभाष मोहिते मो:-९८२३४७२६६०
🌱शेतकरी एकजुटीचा विजयअसो....🌱
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५ जून २०१७
शेतकरी संपात किसानसभा आंबेगाव तालुका समितीचा सक्रीय सहभाग.महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर मा.नायब तहसिलदार यांना निवेदन देताना किसानसभेचे अशोक पेकारी , राजेंद्र घोडे,दत्ता गिरंगे व इतर कार्यकर्ते .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६ जून २०१७
महाराष्ट्रातील आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि जनसंघटनांना कळकळीचे आवाहन : राज्यातील ऐतिहासिक शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी आणि भाजप राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी कालचा महाराष्ट्र बंद ग्रामीण भागात जनतेने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून अभूतपूर्व प्रमाणात यशस्वी केला. इतर अनेक शक्तींसोबत आपल्या पक्षाने आणि जनसंघटनांनी सर्व जिल्ह्यांत या यशासाठी जे प्रचंड योगदान केले, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक व क्रांतिकारक लाल सलाम! या संपासाठी पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पक्ष व किसान सभेच्या सामूहिक नेतृत्वाखाली कॉ डॉ अजित नवले या संपात बजावत असलेल्या कळीच्या भूमिकेमुळे राज्य सरकारचा आणि ते चालविणाऱ्या धर्मान्ध शक्तींचा प्रचंड जळफळाट झाला आहे. इतरही बाबतीत परिस्थिती गुंतागुंतीची आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत आपण सर्वजण कमालीचे सक्रिय आणि सतर्क राहणे निकडीचे आहे. आपल्या राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनसंघटनांच्या नेतृत्वाने सतत स्वतः पुढाकार घेऊन या संपाच्या समन्वय समितीने दिलेली प्रत्येक आंदोलनाची हाक, अधिकाधिक श्रमिक जनतेला सोबत घेऊन आणि या लढ्यात आपल्यासोबत असलेल्या इतर सर्व शक्तींशी जवळीक साधून, प्रत्येक जिल्ह्यात जबरदस्त प्रमाणात यशस्वी केलीच पाहिजे. येणाऱ्या निर्णायक दिवसांत आपण ते निधाराने कराल हा पूर्ण विश्वास आहे.
- कॉ नरसय्या आडम, कॉ महेंद्र सिंह, कॉ डॉ अशोक ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य, माकप
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६ जून २०१७
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या सर्व कार्यकर्त्यांचे कालचा महाराष्ट्र बंद जबरदस्त यशस्वी केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि लाल सलाम! महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक शेतकरी संप खरोखर यशस्वी करण्याकरता आणि या शेतकरीविरोधी भाजप सरकारकडून काही ठोस मागण्या जिंकून घेण्याकरता पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. किसान सभेचा महत्वाचा सहभाग असलेली नवीन समन्वय समिती जी जी आंदोलनाची हाक देईल, ती ती आपापल्या जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांच्या सहभागाने जोरदारपणे यशस्वी करणे हे आपले पहिले आणि अव्वल दर्जाचे कार्य आहे. शेतकरी आंदोलनाचा राज्यव्यापी दबाव जेवढा वाढेल तेवढे हे सरकार वठणीवर येईल हे उघड आहे. शेतकऱ्यांच्या ह्या आंदोलनात किसान सभेचे जास्तीतजास्त बॅनर आणि झेंडे दिसले पाहिजेत. आपल्या जिल्ह्यात या संपात सक्रिय असलेल्या इतर सर्व संघटनांबरोबर व त्यांच्या नेत्यांबरोबर जवळीकीचे संबंध प्रस्थापित करणे हे आपले दुसरे महत्वाचे कार्य आहे. पुढील आंदोलनांतही त्याचा चळवळीला उपयोग होऊ शकतो. आणि या संपलढ्यातून नवनवीन गावातील शेतकऱ्यांशी जिवंत संबंध अनेकपट वाढवून त्यांना लवकरच किसान सभेच्या संघटनेत सभासदनोंदणी, नवीन कार्यकर्ते आणि गाव समित्यांच्या माध्यमातून सामील करून घेणे हे आपले तिसरे निर्णायक कार्य आहे. किसान सभेचे आपले सर्व कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात एक सामूहिक संच म्हणून ही तिन्ही कार्ये उत्साहाने आणि नेटाने पार पाडतील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा लढा विजयी करतील हा विश्वास आहे.
- आपले, आ. जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ अजित नवले, अर्जुन आडे, डॉ अशोक ढवळे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६ जून २०१७
💥शेतकरी संघर्ष सुकाणू समितीची बैठक नाशिक येथे दिनांक 8 रोजी होईल.
💥काही मंडळी तारखेबाबत गोंधळ घालू पाहत आहेत. गोंधळ दूर करण्यासाठी पोस्ट टाकत आहे.
💥शेकाप चे साथी जयंत पाटील हे ही बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
😊...डॉ अजित नवले
राज्य सरचिटणीस
किसान सभा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६ जून २०१७
#ISupportMyFarmers
Nashik:
शेतकरी संपाला पाठींबा साठी ६जून रोजी साडे तिन वाजता सि ए ट कपनी पासूनमोटर सायकल रँली निघणार आहे सहभागी व्हावे...
आज दि.5/6/2017 रोजी अखिलभारतीय किसानसभा माहूर तालुका जि.नांदेड कमिटी च्या वतीने माहूर शहर कडकडीत बंद व तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात आला तसेच किसान क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयाला उद्या दि.6/6/2017 रोजी कुलुप ठोकन्याचा निर्णय घेण्यात आला.या आंदोलनाचे नेत्रुत्व.कॉ.मनोज कीर्तने,कॉ.शंकर सीडाम,कॉ.किशोर पवार,कॉ.कैलास भरने,कॉ.दिलीप गवळी,कॉ.राजू राठोड,कॉ.गांगजी मेश्राम,किशन जगदाळे,सय्यद ईस्माईल व ईतरांनी केले.
शेतकरी संपाबाबत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर सांगलीच्या विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक. आज दुपारी 3 वाजता सांगलीच्या न्यायालयात हजर करणार
अखिलभारतीय किसान सभा किनवट तालूका कमिटी तर्फे शेतकरी कर्ज मूक्त झाले पाहिजे व इतर मागणी घेऊन किनवट येथे दि. 6/6/2017 रोजी उपविभागिय अधिकारी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, व पंचायत समिती ला कुलूप ठोको आंदोलन करताना काॅ. अर्जून आडे, काॅ. प्रकाश वानखेडे, काॅ.खंडेराव कानडे, काॅ. विजय जाधव, काॅ.मोहन जाधव,काॅ.शेषेराव ढोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.आणि शेवटी SDO यांना भेटून आंदोलनाचे सांगता करण्यात आले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६ जून २०१७
शेतकरी संपाच्या अचीवमेंट्स आणि या संपाची पुढची दिशा संदर्भात
...या अभूतपूर्व लढ्याने काही गोष्टी साध्य केल्या आहेत.
1) शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आणण्यामध्ये हे आंदोलन/संप यशस्वी झाला आहे...
2) सर्व वेगवेगळ्या संघटना या एकठिकाणी एकवटण्याची प्रक्रिया या संपाद्वारे सुरु झाली आहे...
3) शेती क्षेत्रामध्ये काम करणारे जे विचारवंत आहेत, त्या विचारवंतांनी एकत्र येऊन काही दीर्घकालीन कार्यक्रम या प्रक्रियेसाठी त्यांच एकमत करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे.
4) हा संप आता केवळ महाराष्ट्रापुरता सीमित राहणार नाही तर त्याचा देशव्यापी स्वरूप यायला आणि अखिल भारतीय शेतकऱ्यांची एकजूट होण्याकडे वाटचाल व्हायला या संपाने सुरुवात केली आहे...
परंतु या संपाची खरी अचिवमेंट म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणं आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं हे या संपाची खरी अचिवमेंट असणार आहे.
ही अचिवमेंट करण्यासाठी आपण जी संपाची भाषा आजपर्यंत बोलतो आहोत ती एकप्रकारे आत्मक्लेशाशी भाषा आहे म्हणजे शेतकाऱ्यांनी कष्टाने पिकवलेला शेतीमाल हा स्वतःच नुकसान सहन करून स्वतःचे श्रम वाया घालून एक प्रकारे आत्मक्लेश करून घेण्याचा प्रकार म्हणजेच खर तर संप होता.
परंतु ही आत्मक्लेशाची भाषा जर माननीय मुखमंत्र्याना समजत नसेल त्यांना ती समजून घ्यायची नसेल तर मग येती जी बैठक आहे 8 तारखेची त्याच्यामध्ये आम्ही सर्व शेतकरी नेते, कार्यकर्ते , संघटना आणि विचारवंत एकत्र येऊत, ही आत्मक्लेशाच्या भाषेव्यतिरिक्त कोणती भाषा आम्ही बोलायला पाहिजे जी मुख्यमंत्र्यांना अचूकपणाने समजेल याच विचारमंथन आम्ही नक्की करू, आणि ज्या भाषेमध्ये सरकारला समजेल अशा भाषेमध्ये पुढे कस जायच याच्याबद्दल आम्ही विचार करू. पण आम्ही नम्रपणाने सांगू की, प्राणाचा शेवटचा श्वास बाकी असेपर्यंत ही सगळी एकजूट टिकवण्यासाठी, विचारवंतांची एकजूट टिकवण्यासाठी, संघटनांची एकजूट टिकवण्यासाठी आणि एकंदरीतच शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही झटत राहूत. सातबारा कोरा होईपर्यंत आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू होईपर्यंत सबंध शेतकरी समुदायाला एकत्र करत प्राणपणाने आम्ही लढत राहूत हा विश्वास या संपाने दिलाय. आणि हीच आमची पुढे वाढण्याची किंवा पुढे जाण्याची आमची दिशा असणार आहे.
- डॉ. अजित नवले
(राज्य निमंत्रक सुकाणू समिति तथा राज्य सरचिटणीस अखिल भारतीय किसान सभा)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिनांक ७ जून २०१७
शहरी-ग्रामीण भेद न करता सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे
स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीचे आवाहन
महाराष्ट्र राज्यात सध्या सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संपाला स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती या राज्यातील विविध पुरोगामी धर्मनिरपेक्ष महिला संघटनां–संस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या संयुक्त मंचाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहोत. तसेच मध्य प्रदेश येथे शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस गोळीबाराचा तीव्र निषेध करून, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पुरेशी नुकसान भरपाई व त्यांच्या कुटुंबातील किमान एक स्त्रीला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी करीत आहोत.
वस्तुतः शेती व्यवसाय स्त्रियांच्या श्रमावरच उभा आहे, शेती व्यवसायात स्त्रियांच्या श्रमाचा हिस्सा निम्म्या पेक्षा जास्त असूनही पुरुषप्रधान व्यवस्थेत केवळ त्यांच्या नावे जमीन नसल्याने त्यांना परंपरेने “शेतकरी” मानले जात नाही. पण सरकारी दफ्तरांतून नोंद नसली तरी सरकारच्या शेतकरी-विरोधी आणि कॉर्पोरेट-धार्जिण्या कृषी धोरणाचे चटके त्या अनेक वर्ष सोसत आहेत हे सत्य डोळ्याआड केले जाऊ नये. शासकीय धोरणांमुळे तयार झालेल्या कृषी संकटाची सगळ्यात जास्त झळ त्यांनाच पोचत आहे. महागाई, बेरोजगारी, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार, शेतकरी पुरुषांच्या आत्महत्या, इत्यादि समस्यांना सामोरे जात त्या घर चालवतात. शिवाय सावकार, बँकांचे तगादे आणि गावातले गुंड ह्यांना तोंड देत जगण्याचे मोठे आव्हान त्या पेलताहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सध्याच्या आंदोलनांत त्यांचा स्वाभाविक सहभाग आहे, ह्याची नोंद सर्वांनी घेतली पाहिजे.
संपूर्ण कर्ज माफी, शेती-मालाला उत्पादनाच्या खर्चाच्या दीडपटाने हमी भाव, शेतकऱ्यांच्या हिताचे आयात-निर्यात धोरण, वीज, पाणी, खते, बी-बियाणांच्या दरांवर शासकीय नियंत्रण, कृषी क्षेत्रांत आवश्यक सरकारी गुंतवणूक, तसेच स्वामीनाथन समितीच्या अन्य शिफारसींची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना पेन्शन, ह्या समस्त शेतकरी स्त्री-पुरुषांच्या मागण्या रास्त असून, फडणवीस सरकारने आंदोलनाच्या प्रतिनिधींशी त्वरित चर्चा करून समाधानकारक तोडगा काढावा. तसेच शासनाने आंदोलक शेतकऱ्यांवर खटले भरू नयेत, आणि यापूर्वी दिलेली आश्वासने देखील पूर्ण करावीत अशी आमची मागणी आहे.
शेती हा मूलभूत व्यवसाय असून आपणा सर्वांचे आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक जीवन त्याच्याशी निगडित आहे हे आपण विसरता कामा नये. काही शहरी मध्यमवर्गीय मंडळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत, त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.
शहरी-ग्रामीण असा भेद न करता, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा द्यावा असे आवाहन आम्ही करीत आहोत.
स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती करिता
विद्या बाळ व प्रीती करमरकर (नारी समता मंच), किरण मोघे व सोन्या गिल (अ. भा. जनवादी महिला संघटना), शांता रानडे व लता भिसे (भारतीय अहिला फेडरेशन), अलका पावनगडकर (स्त्री मुक्ती संघटना), विजया चौहान, नागमणी राव, अंजली मायदेव (बहुजन भारिप-महिला आघाडी), आनंद पवार (सम्यक), मनीषा गुप्ते व क्रांति अग्निहोत्री (मासूम), निर्मला साठे व प्राजक्ता पाठक (आलोचना), असुंता पारधे (चेतना महिला विकास मंच), अच्युत बोरगावकर (तथापि), मिलिंद चव्हाण, मेधा काळे, प्रसन्न इन्वली, साधना खती, संयोगिता ढमढेरे, अर्चना मोरे, साधना नातू, विद्या कुलकर्णी आणि इतर कार्यकर्त्या, संघटना
स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लॉ कॉलेज रस्ता, सिंडीकेट बँकेसमोर, पुणे ४११ ००४
संपर्क: किरण मोघे (९४२२३१७२१२), लता भिसे (९०४९६८४०२५)
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------
7th June 2017
STREE MUKTI ANDOLAN SAMPARK SAMITI APPEALS TO ALL CITIZENS TO STAND BY FARMERS IN THEIR ONGOING STRUGGLE
The Stree Mukti Andolan Sampark Samiti, a joint platform of progressive secular women’s organizations and activists extends its heartfelt support to the ongoing historic struggle of farmers in Maharashtra. We also strongly condemn the firing on peasants in Madhya Pradesh and demand that along with due adequate compensation to the families of the martyred farmers, at least one woman from each of their families should be given a government job.
It is an undisputed fact that the entire agricultural sector survives on the basis of women’s work. While they contribute more than half the labour done in agriculture, traditionally, women are not perceived as “farmers” simply because the patriarchal system denies women ownership of land. Despite lack of official recognition, women farmers are the worst sufferers of the agrarian crisis that is an outcome of the anti - farmer and pro - corporate agricultural policies of successive governments. They continue to carry the burden of their household responsibilities in the face of rising prices, unemployment, alchoholism, domestic violence, suicides of men farmers, etc. and constant harassment by private moneylenders, bank officials, and anti-social elements. It should therefore be noted that women are an integral part of the current struggle being waged by farmers in different parts of Maharashtra.
We support the just demands of all women and men farmers for a total loan waiver, the cost-plus 50% formula for arriving at the minimum support price, trade policies that are conducive to farmers’ interests, price control on agricultural inputs such as fertilizer, electricity, seeds, water, etc., adequate public investment in the agricultural sector, and other recommendations of the Swaminathan Committee along with a pension for farmers. We demand that the Fadanvis government immediately initiates talks to arrive at a satisfactory agreement with them. We also demand that no cases should be filed against the agitating farmers, and the government also complies with all assurances given earlier on their issues.
We must not forget that agriculture is a fundamental part of our economy, and plays an important economic, social and cultural role in our lives. It is condemnable that some middle class urban people are poking fun at the farmers struggle and making nasty comments about them.
It is our sincere appeal that all citizens, rural and urban should stand by the farmers, endorse their demands, and extend active support to them.
*ON BEHALF OF STREE MUKTI ANDOLAN SAMPARK SAMITI*
Vidya Bal and Preeti Karmarkar
(Nari Samata Manch),
Kiran Moghe and Sonya Gill
(All India Democratic Women’s Association), Shanta Ranade and Lata Bhise
(National Federation of Indian Women),
Alka Pawangadkar (Stree Mukti Sanghatana),
Vijaya Chauhan, Nagmani Rao, Anjali Maydeo
(Bahujan Bharip Mahila Aghadi),
Anand Pawar (Samyak),
Manisha Gupte and Kranti Agnihotri (Masum),
Nirmala Sathe and Prajakta Pathak (Aalochana),
Assunta Pardhe (Chetana Mahila Vikas Manch),
Achut Borgaonkar (Tathapi),
Medha Kale, Milind Chavhan, Prasanna Invally, Sadhana Khati, Sanyogita Dhamdhere, Archana More, Sadhana Natu, Vidya Kulkarni and others,
Stree Mukti Andolan Sampark Samiti, Law College Road, Opposite Syndicate Bank, Pune 411 004
Contact: Kiran Moghe (9422317212), Lata Bhise (9049684025)
७ जून २०१७
शेतकऱ्यांवर पोलिसी अत्याचार करणाऱ्या मध्यप्रदेश व महाराष्ट्र भाजपा राज्य सरकारचा निषेध!
शेतकऱ्यांचे खुनी, मध्यप्रदेश भाजपा सरकारचा सीटूच्या वतीने तीव्र निषेध!!
मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात शेतीमालाला किफ़ायतशीर भाव व कर्ज माफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांमार्फ़त गोळीबार करून 6 शेतकऱ्यांचा खून करणाऱ्या भाजपा राज्य सरकारचा सीटू तीव्र निषेध करीत आहे.
वस्तुत: विधानसभा व् लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने वरील दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन निवडणूक जाहिरनाम्यात् दिले होते. परंतु सत्तेवर आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या भाजपा सरकारने पूर्ण केल्या नाहीत व् शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करीत आहे व शेतकऱ्यांचे खून पाडण्यापर्यन्त भाजपा सत्तांध झाली आहे.
महाराष्ट्रातही 1 जून पासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपावर लाढीमार करणे,गोळीबार करणे, अन्दोलकांना अटक करून जेलमध्ये टाकणे,जमावबंदी लागु करून आंदोलन दडपणे, अशी पोलिसी दडपशाही फडणवीस सरकार करीत आहे.तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी अन्दोलकांवरील सर्व केसेस राज्य सरकारने मागे घ्याव्यात, अटक केलेल्यांची बिनशर्त सुटका करावी व शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी सीटू करीत आहे.
डॉ डी एल कराड
राष्ट्रीय उपाध्यक्ष,सीटू
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८ जून २०१७
नाशिक येथील सुकाणू समितीच्या बैठकीनंतर किसान क्रांती आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर
✅ सुकाणू समितीने सरकारला दिले 3 दिवसांत मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे अल्टिमेटम
✅ 12 जूनला तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय वर ठिय्या आंदोलन
✅ 13 जूनला राज्यात रेल्वे रोको,रास्ता रोको
✅ आजपासून एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात कार्यक्रम करू देणार नाही
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
९ जून २०१७
शेतकरी राजा जागा हो,संघर्षाचा धागा हो
पेटले हे रानसारे कोण विझवी याला
देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यांची संख्या असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे
महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या विचारसरणी च्या शेतकरी संघटना आणि किसान सभा पहिल्यांदाच एकजुटीने व जिद्दी ने शेतकऱ्यांच्या जीवन मरणाची लढाई लढत आहेत महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांची मरण भूमी नाही तर शेतकरी आंदोलनाची रणभूमि बनत आहे.
दोस्तहो हीच वेळ आहे आपल्या रात्रंदिवस काबाडकष्ट करणार्या शेतकरी शेतमजूर माय बापावरील पिढ्यानपिढ्या च्या पिळवणूक व लुटीच्या हिसाब चुकता करण्याची !!
शेतकरी आंदोलनातील पुढील महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन ठाम निर्धार व एकजुटीने संघर्ष करण्याची !!
देशभरातील शेतकरी आंदोलनाची एक साखळी बांधण्याची !!
शेतकरी विरोधी भांडवलदार व थैलीशहा यांचा माज उतरविण्याची !!
संपुर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला रास्त व किफायतशीर भाव मिळविण्यासाठी !!
संपूर्ण कर्जमाफी व स्वामीनाथन शिफारशींची अंमलबजावणी करावी या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करण्या ऐवजी भाजपा सरकार मध्य प्रदेशात शेतकऱ्यांवर गोळीबार करून पाच शेतकऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार आहे तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना गुंड ठरवित आहे.
शेतकरी आंदोलनाची भाजपा सरकार उपेक्षा करित आहे आणि व्यवहारात मात्र रोज भांडवलदार व कार्पोरेट जगताला हजारों कोटी रुपयांची कर्जमाफी देत आहे.
स्वामिनाथन कमिशनच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची पहिली जबाबदारी दिल्लीतील मोदींच्या केंद्र शासनाची आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांवर सातत्याने वाढता कर्जाचा बोजा हा प्रामुख्याने सर्व प्रकारच्या शेतीमालाच्या कोसळत्या किमतीमुळे आहे. तसेच लागोपाठच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आणखीनच वाढला आहे. शेतकरी संपाबाबत महाराष्ट्र सरकारने पुढे केलेला कर्जमाफीचा प्रस्ताव हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार आहे. शेतकऱ्यांवरील अनेक प्रकारच्या कर्जापैकी पीक कर्जाचा बोजा हा कर्जाचे नूतनीकरण व पुनर्गठनातून प्रचंड वाढला आहे. दुष्काळी वर्षातील अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर करून शेतकऱ्यांना चालू बाकीदार बनविण्यात आले आहे अल्प भूधारकाची मर्यादा घातल्याने प्रामुख्याने कोरडवाहू व मराठवाडा-विदर्भातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर वंचित राहणार आहेत वास्तविक याच घटकातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे.
शेतकरी विरोधी भूमिका घेऊन मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांवर भाजपा सरकारने गोळीबार केला. या गोळीबारात ५ शेतकऱ्यांचे बळी भाजपा सरकारने घेतले आहेत याचा तीव्र धिक्कार आपण करीत आहे शेतकरी संपाच्या मागण्या पूर्ण करून केंद्र शासनाने तोडगा काढावा या साठी,
दि 12 जून २०१७ सोमवार रोजी तहसील कचेरीवर धरणे आंदोलनात सहभागी व्हा
दि 13 जून 2017 मंगळवार रोजी रेल्वे रोको आंदोलनात सहभागी व्हा
एकाही मंत्र्यांना महाराष्ट्रात कोणत्याही कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण बंदी
सर्व समविचारी संघटना व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे.
अखिल भारतीय किसान सभा
महाराष्ट्र राज्य कमिटी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१० जून २०१७
महाराष्ट्रातील किसान आंदोलन तीव्र होणार, राज्य शासन शेवटी बोलणी करण्यास तयार
1 जूनपासून गेले 10 दिवस सातत्याने चालू असलेल्या महाराष्ट्रातील किसानांच्या संयुक्त आंदोलनाच्या प्रचंड दबावामुळे शेवटी राज्य शासनाने शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे तसेच त्यासाठी विशेष मंत्रीगटाचे देखील गठन केले आहे.
राज्य शासनाने उद्या दिनांक 11 जून 2017 रोजी चर्चेसाठी निमंत्रण देणारे पत्रही समन्वय समितीला पाठवले आहे.
ह्याआधी 8 जून रोजी नाशिकमध्ये भव्य असा राज्यव्यापी शेतकरी मेळावा झाला ज्यात हजारो शेतकरी उपस्थित होते.
ह्या मेळाव्यात 12 जूनला जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन आणि त्या पाठोपाठ 13 जूनला प्रचंड असे राज्यव्यापी रेल रोको/ रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेळाव्यात मध्य प्रदेशातील भाजप सरकारने मंदसौर येथे शेतकऱ्यांवर केलेल्या क्रूर पोलीसी गोळीबाराचा तीव्र निषेध करण्यात आला.
आंदोलनाच्या कृती कार्यक्रमाचा ठराव समन्वय समितीचे निमंत्रक व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डाॅ अजित नवले यांनी मांडला व राज्यातील सर्व प्रमुख शेतकऱ्यांच्या संघटनांच्या नेत्यांनी त्या ठरावाला पाठिंबा दिला. ह्यामध्ये खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, विधान परिषदे आमदार जयंत पाटील, डाॅ अशोक ढवळे, रघुनाथदादा पाटील, नामदेव गावडे आणि इतर अनेकांचा समावेश होता.
ह्या मेळाव्याला व त्यात दिल्या गेलेल्या आंदोलनाच्या कार्यक्रमाला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून राज्यभरात चांगली प्रसिद्धी मिळाली. गेल्या दहा दिवसांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दर्शविलेल्या अभूतपूर्व अशा एकजुटीमुळे राज्य शासनाला चर्चा करण्याची तयारी दाखविण्यास भाग पाडले आहे. परंतु प्रत्यक्षात ते कोणत्या मागण्या मान्य करतात हे मात्र पहावे लागेल.
डाॅ अशोक ढवळे
सहसचिव,
अखिल भारतीय किसान सभा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बैठकीतले ठळक मुद्दे :-
> शेतकऱ्यांना निकषांसह तत्वत: सरसकट कर्जमाफी
> अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासूनच कर्जमाफी
> कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांचा सरकारला २५ जुलैपर्यंत अल्टीमेटम
> २५ जुलैपर्यंत कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास २६ जुलैपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, शहरांमध्ये येणारं दूध-भाजीपाला रोखणार
> स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसंदर्भात मुख्यमंत्री सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसह पंतप्रधानांशी चर्चा करणार
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दणदणीत विजय
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे अखेर सरकार झुकले आहे. शेतकऱ्यांना निकषांसह सरसकट कर्जमाफी देण्याचा तत्वत: निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासूनच कर्जमाफी देण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तूर्त मागे घेतलं आहे. जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर २६ जुलैपासून पुन्हा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला आहे.
शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार मंत्रिगटाची ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी शेतकरी संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढल्याने १३ जूनला होणारा रेल रोको मागे घेण्यात आल्याचं सुकाणू समितीचे सदस्य खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केलं.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३१ ऑक्टोबरपासून कर्जमाफी देण्याचं राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलं होतं. मात्र याबाबत सुकाणू समितीने आक्रमक भूमिका घेतली आणि आजपासूनच कर्जमाफी करण्याची मागणी केली, तीही सरकारने मान्य केली. सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले म्हणाले, 'शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा उभा केला. नियत साफ होती, त्यामुळे लढ्याला यश आले. पुणतांबे गावच्या सर्व शेतकऱ्यांचे आभार. सर्व शेतकरी नेते या आंदोलनासाठी एकत्र आले, ही अभूतपूर्व घटना आहे.'
राजू शेट्टी यांनी कर्जमाफीसाठीच्या निकषांबाबत माहिती देताना सांगितले की, 'सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा या दोन प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. जे शेतकरी सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहेत, अशा शेतकऱ्यांना कर्जाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होणार आहेत. जे शेतकरी आयकर भरतात, ज्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यासंबंधीचे जे निकष असतील त्यात आम्ही सरकारला सहकार्य करू.'
बैठकीतले ठळक मुद्दे :-
> शेतकऱ्यांना निकषांसह तत्वत: सरसकट कर्जमाफी
> अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासूनच कर्जमाफी
> कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांचा सरकारला २५ जुलैपर्यंत अल्टीमेटम
> २५ जुलैपर्यंत कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास २६ जुलैपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, शहरांमध्ये येणारं दूध-भाजीपाला रोखणार
> स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसंदर्भात मुख्यमंत्री सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसह पंतप्रधानांशी चर्चा करणार
-----------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकरी एकजुटीसमोर सरकार ला झुकावे लागले
कर्ज माफी होणार
माझ्या लढाऊ माय माऊलीला क्रांतिकारी सलाम आज सरकारला भाग पाडले झुकायला आणि मागण्या मान्य करायला. शेतकरी एकजूट काय असते सगळ्या जगाला दाखवुन दिले. क्रांतिकारी लाल सलाम कॉ डॉ अजित नवले व सर्व किसान सभा नेतृत्वास ज्यांनी सरकारच्या फुट पाडणाऱ्या शक्ती विरोधात खंबीर पणे उभे राहत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनाना एकजूट करत हा लढा तीव्र केला. पुढे घेऊन गेले. ही लढाई इथेच संपली नाही तर संघर्ष येणाऱ्या काळात आणखी संघटीत पणे लढा उभा राहील.
इन्कलाब झिंदाबाद
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
HISTORIC VICTORY OF THE PEASANTRY OF MAHARASHTRA!
Today June 11 saw the historic victory of the peasantry of Maharashtra, after a 10 day novel and unprecedented strike, backed by a massive Maharashtra Bandh on June 5. Under pressure of the unity and struggle of the peasantry and the impending call for a militant statewide Rail Roko and Rasta Roko struggle on June 13, the BJP-Shiv Sena state govt represented by the high-powered committee of five cabinet ministers today held talks with the Coordination Committee of Peasant Organisations in Mumbai.
After strenuous negotiations for over three hours, the govt agreed to the following demands:
1. Complete loan waiver to the peasantry, subject to certain criteria to exclude the rich sections. These criteria will be decided within one month by a 10 member committee comprising 5 representatives of the Kisan organisations and 5 of the state government.
2. Implementation of loan waiver to all peasants holding less than 5 acres of land with immediate effect and new loans to be given to them immediately for the coming sowing season.
3. Substantial increase in the price of milk to be paid to the peasantry as per the formula that 70 per cent of the selling price of milk will go to the peasant and 30 per cent to the processing institute for its expenses.
4. CM will take a delegation of peasant organisations to the PM to insist on the Swaminathan Commission recommendation of fixing MSP to cover cost of production plus 50 per cent profit.
5. State govt will give written reply to other points in the memorandum.
6. Police cases in this struggle will be immediately withdrawn.
The peasant organisations were represented in the talks by Raju Shetty, MP, Bachhu Kadu, MLA, Jayant Patil, MLC, Raghunathdada Patil, Dr Ashok Dhawale (AIKS), Convenor of the committee Dr Ajit Nawale (AIKS), Namdev Gavade and others. The state government was represented by cabinet ministers Chandrakant Patil, Divakar Ravte, Pandurang Fundkar, Girish Mahajan and Subhash Deshmukh. If the criteria of the loan waiver are not satisfactorily decided before the state assembly session begins on July 24, it was declared that the Committee will re-launch the struggle from July 26, the birth anniversary of renowned social reformer Chhatrapati Shahu Maharaj.
This victory has been hailed far and wide by the peasantry of Maharashtra and the media has also welcomed it profusely in lead headlines. The significant point is that the AIKS was widely acknowledged as the focal point of this remarkable struggle and it took the lead in uniting all other peasant organisations in the state to successfully overcome the vile attempt by the govt and some blacklegs to break the peasant strike on June 3.
- Dr Ashok Dhawale, Joint Secretary, All India Kisan Sabha
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकरी संप व लढ्याची फलनिष्पत्ती
👉२ जून रोजी काय मिळाले होते आणि लढ्या नंतर आपण काय मिळविले ?
👉 दिनांक २ जून रोजी मा. मुख्यमंत्री यांनी अल्पभूधारक शेतक-यांची कर्जमुक्ती करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर आपले आक्षेप खालीलप्रमाणे होते.
👉1. अल्पभूधारक शेतक-यांचे किती कर्ज माफ करणार ते स्पष्ट नव्हते.
👉2. केवळ थकबाकीदार अल्पभूधारकांचे कर्ज माफ करणार की नियमित कर्ज भरणा-या म्हणजे नवे जुने करून पुन्हा कर्ज घेणारांचेही कर्ज माफ करणार हे स्पष्ट नव्हते.
👉3. संकटात आहेत, जमीन कोरडवाहू असल्याने अत्यल्प उत्पन्न मिळते आहे मात्र केवळ जमीन पाच एकर पेक्षा जास्त आहे अशा शेतक-यांना वंचित ठेवले जाणार होते.
👉4. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींचे काय करणार हे स्पष्ट नव्हते.
👉5. दुध धंदा किफायतशीर करण्यासाठी काय करणार हे स्पष्ट नव्हते.
👉२ जून नंतर सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या नंतर झालेल्या लढ्याने काय दिले ?
👉1. अल्पभूधारक शेतक-यांचे कर्ज सरकार ३१ ऑक्टोबर नंतर माफ करणार होते. नवा पिक हंगाम मात्र आता सुरु होत आहे. अशा परिस्थितीत थकबाकीदार शेतक-यांना नवे कर्ज मिळणे अशक्य झाले होते.
💥आंदोलनामुळे ३१ ऑक्टोबरची तारीख बदलून ती सरकारने चर्चेच्या दिवशीच (११ जून) अल्पभूधारकांचे कर्ज माफ झाल्याची घोषणा सर्व माध्यमांसमोर केली. परिणामी सुरु होत असलेल्या हंगामात थकबाकीदार शेतक-यांना नवे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
👉2. अगोदरच्या घोषणेत नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांच्या कर्जमाफीचे काय तसेच संकटात आहेत पण जमीन पाच एकर पेक्षा जास्त आहे अशा शेतक-यांच्या कर्जमाफीचे काय या बाबत काहीच तरतूद नव्हती.
💥समन्वय समितीने या प्रश्नांवर मंत्री गटा बरोबर अत्यंत निकराने चर्चा केली. कर्जमाफीचे निकष ठरविताना कर्जाची थकबाकीता (थकबाकीदार आहे किंवा नाही) व भूधारणा ( अल्पभूधारक आहे की अधिक जमीन धारक आहे ) हे निकष लावता कामा नये हा आग्रह धरला. मंत्री गटाने मुख्यमंत्र्यां बरोबर चर्चा करून समन्वय समितीचा हा आग्रह मान्य केला. काही निकष लाऊन सरसगट कर्ज माफ करणार असल्याची घोषणा केली.
👉3. निकष कशाला हवेत याबाबत सरकारकडून सांगण्यात आले की हे निकष गरजू व संकटग्रस्त शेतक-यांना अडचण ठरणार नाहीत असेच बनविले जातील. शेतक-यांच्या आडून धनदांडग्यांनी या कर्जमाफीचा लाभ घेऊ नये यासाठी हे निकष ठरविले जाणार आहेत.
💥निकष शेतक-यांवर अन्याय करणारे ठरू नयेत यासाठी निकष ठरविणारी एक समिती बनविण्यात येईल. या समितीमध्ये सरकारचे पाच व शेतकरी संघटनाचे पाच प्रतिनिधी असतील. सर्व जण अत्यंत अभ्यासपूर्वक हे निकष ठरवतील.
👉4. तत्त्वतः कर्ज माफी या घोषणेत तत्वत: या शब्दा बाबत आक्षेप घेतला गेला. सरकारच्या वतीने सांगण्यात आले की......
💥 अल्प भूधारकांसाठी लगेच कर्जमाफी लागू झाली आहे. त्यांच्या कर्जाची हमी सरकार घेत आहे. त्यांना उद्यापासून नव्या हंगामासाठी लगेच कर्ज मिळणार आहे.
💥 बाकींसाठीचे निकष अजून ठरायचे आहेत म्हणून त्यांच्यासाठी तत्त्वतः हा शब्द वापरीत आहे.
👉5. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी ही मागणी करण्यात आली. हा विषय केंद्र सरकारशी संबंधित असल्याने मा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांचे शिष्टमंडळ मा. पंतप्रधान यांना भेटेल. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासंबंधी या भेटीत निर्णय घेण्यात येतील.
👉6. दुधाचे भाव वाढविण्यात येत आहेत. शिवाय दीर्घकालीन धोरण म्हणून दुधधंदा किफायतीचा व्हावा यासाठी ७० * ३० चे धोरण या व्यवसायाला लागू करण्याचाही महत्वपूर्ण निर्णय चर्चेत जाहीर करण्यात आला. या नव्या धोरणा नुसार दुध उत्पादकांना दुध विक्री दराचा ७० टक्के हिस्सा मिळणार आहे. प्रक्रियादारांनी उर्वरित ३० टक्के रकमेत आपला खर्च भागविणे अपेक्षित आहे.
👉7. सुकाणू समितीने आपल्या ३० मागण्यांचा मसुदा यावेळी मंत्री गटाला दिला. या मध्ये शेतकरी पेन्शन, तूर, कांदा, धान, कापूस, सिंचन, वीज या विषयीच्या विस्तृत मागण्यां ठेवण्यात आल्या. सदरच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चेच्या फे-या घेण्याचे व लेखी स्वरुपात मागण्यांबाबत प्रस्ताव देण्याचे सरकारच्या मंत्री गटाने मान्य केले.
संप व लढ्याच्या उपलब्धी
💥1. शेतक-यांच्या या लढ्याचे खरे नेतृत्व महाराष्ट्रातील तरुण शेतक-यांनी केले.
💥2. शेतक-यांच्या बहुतांश शेतकरी संघटना व शेतकरी नेते या लढ्यात एकत्र आले व लढ्याच्या मागे ठामपणे उभे राहिले.
💥3. लढ्याची व्याप्ती महाराष्ट्रा बाहेर मध्यप्रदेशासह इतर राज्यातही वाढली.
💥4. शेतकरी प्रश्न हे निर्णय प्रक्रिया व चर्चेच्या मध्यस्थानी आले.
💥5. शेतकरी, शेतकरी संघटना, शेतकरी नेते व विचारवंत यांची राज्यव्यापी एकजूट आकार घेऊ लागली.
👉लढा मागे घेण्यात आलेला नाही केवळ १२ व १३ जून च्या कृती स्थगित करण्यात आल्या आहेत.
👉ठरल्याप्रमाणे मागण्यांची अंमलबजावणी दिनांक २५ जुलै २०१७ पूर्वी झाली नाही तर २६ जुलै २०१७ पासून शेतकरी लढ्याला पुन्हा सुरुवात करण्यात येईल.
👉सर्व शेतकरी व सुकाणू समितीतील सर्व शेतकरी संघटना या लढ्यात भाग घेतील.
डॉ. अजित नवले
समन्वयक,
शेतकरी संघटनांची सुकाणू समिती, महाराष्ट्र


Comments
Post a Comment