मार्क्स आणि वर्तमान- प्रकाश कारत
या वर्षी ५ मे रोजी मार्क्सची १९९वी जयंती साजरी करण्यात आली. येते वर्ष त्याच्या द्वीशताब्दीचे. सारे जग ते साजरे करील.
एकोणिसाव्या शतकातील एका तत्वज्ञाचे आजच्या जगाच्या दृष्टीने काय महत्व, असा प्रश्न कुणी उपस्थित करील. विशेषत: एकविसाव्या शतकातल्या लोकांच्या दृष्टीने काय महत्व असेल?

२०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या मार्क्सने 'भांडवल' हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे भांडवलशाहीची परिपूर्ण समीक्षा आहे. आणि तो ग्रंथ १५० वर्षांपूर्वी, म्हणजे १८६७ साली प्रकाशित झाला. तेव्हा दोनशे वर्षांआधी जन्माला आलेल्या या माणसाचे आणि त्याच्या दीडशे वर्षांपूर्वीच्या ग्रंथातील विचारांचे आजच्या दृष्टीने काय महत्व?
मार्क्सवादातील प्रस्तुतता आणि जिवंतपणा समजून घेण्यासाठी २००८ साली काय घडले, यावर ओझरती नजर टाकूया. त्या वर्षी आलेल्या सखोल वित्तीय अरिष्टाने भांडवली व्यवस्थेला पूर्णत: वेढून टाकले. त्या घटनेला १० वर्षे होत आलेली असली तरी जागतिक भांडवली व्यवस्था या अरिष्टातून पूर्णतया बाहेर पडलेली नाही.
या अरिष्टाने सर्वांना बुचकाळ्यात टाकणारी गोष्ट घडली. भांडवली विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ स्वत:च मार्क्सचे ग्रंथ धुंडाळू लागले. त्यातील काही प्रामाणिक निघाले आणि त्यांनी मार्क्सने केलेल्या भांडवलशाहीच्या विश्लेषणाला दादही द्यायला सुरवात केली. नूरियेल रूबिनी हे एक नामवंत अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते काही मार्क्सवादी नाहीत. ते म्हणतात, "मार्क्स बरोबर निघाला, कुठल्या ना कुठल्या क्षणी भांडवलशाही स्वत:लाच नष्ट करते." पुढे जाऊन ते म्हणतात, "बाजारपेठ व्यवस्थित चालू शकते, असा आमचा समज होता, तो काही खरा नाही."
आज जगाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या म्हणजे जागतिकीकरणाचे जनतेवरील दुष्परिणाम, विषमतेत न भूतो अशी वाढ आणि पर्यावरणाचा विनाश. या सर्व समस्या उद्भवणार असल्याचे मार्क्सने दीडशे वर्षांआधीच पाहिले होते. मार्क्स आणि एंगल्स यांनी संयुक्तपणे लिहिलेले एक क्रांतिकारक पुस्तक म्हणजे 'कम्युनिस्ट जाहीरनामा'. तो १८४८ साली प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी भांडवलशाहीच्या जागतिकीकरणाचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे, "आपल्या उत्पादनाची बाजारपेठ विस्तारण्याची गरज भांडवलदाराचा जगभर पाठलाग करत आहे. तिने प्रत्येक ठिकाणी तंबू ठोकायलाच हवा, आपली वस्ती करायलाच हवा, सर्वत्र संबंध प्रस्थापित करायलाच हवेत."
मार्क्स जिवंत असतानाच 'भांडवल' ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला होता. नंतरचे दोन खंड त्याच्या मृत्यूनंतर एंगल्सने प्रकाशित केले. हे ग्रंथ म्हणजे मार्क्सने भांडवली व्यवस्था कशी चालते याचे केलेले परिपूर्ण विश्लेषण होय. 'या व्यवस्थेच्या चलनवलनाचे अंतर्गत नियम' त्याने उलगडून दाखवले. श्रमातून अतिरिक्त मूल्य कसे पिळून काढले जाते, उत्पादन साधनांच्या मालकांच्या हातात भांडवल आणि संपत्ती कशी साचत जातात, विषमता कशी वाढत जाते, अति उत्पादनाचे अरिष्ट कसे निर्माण होते, आणि भांडवलशाहीत व्यवस्थेमुळेच वारंवार अरिष्टे का येतात हे सर्व त्याने 'भांडवल' मध्ये उलगडून दाखवले. मार्क्सनंतरच्या आपल्या वाटचालीत भांडवलशाहीने मार्क्सचे विश्लेषण खरेच असल्याचे सिद्ध केले आहे.
भांडवलशाही पुढे मक्तेदारीत विकसित झाली. या अवस्थेतील भांडवल हे जागतिक स्वरूपातील वित्त भांडवल असते. मार्क्सची शास्त्रीय अभ्यास पद्धत वापरूनच त्याचे स्वरूप समजून घेता येते. लेनीनने मार्क्सची ही अभ्यास पद्धत वापरून विसाव्या शतकाच्या सुरवातीला उदयाला आलेल्या मक्तेदार भांडवलशाही आणि साम्राज्यवादाचे विशलेषण केले. विसाव्या शतकातील सर्व ऐतिहासिक घटनांचे शास्त्रीय विशलेषण मार्क्सने मांडलेल्या समाजविकासाच्या सिद्धांताच्या आधारावर करता येते. मग तो फॅसिझमचा उदय असो, वसाहतींमधील मुक्तिलढे असो की समाजवादाची प्रस्तापना असो.
आपल्या 'भांडवल' या ग्रंथातील मांडणीसोबतच ऐतिहासिक भौतिकवाद हे मार्क्सने मानवाच्या वैचारिक वारशाला केलेले मोठे योगदान आहे. द्वंद्वात्मक विचारपद्धती आणि भौतिकवाद यांचे संयुग म्हणजे मार्क्सवादी तत्वज्ञान. या तत्वज्ञानाचा वापर करून मार्क्सने मानवी इतिहासाच्या विकासाचे शास्त्रीय विवेचन केले.
एका उत्पादन पद्धतीतून दुसरी उत्पादन पद्धत विकसित होत जाते आणि त्यातून जुन्या समाजाच्या जागी नवा समाज घडतो, हे मार्क्सने दाखवून दिले. समाजाची वर्गात विभागणी झाल्यानंतर वर्गसंघर्ष हे सामाजिक बदलाचे इंजिन बनले आहे. 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' सांगतो, 'आजवरच्या समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.'
मार्क्स हा केवळ अर्थशास्त्रज्ञ वा राजकीय विचारवंत नव्हता. त्याने एक क्रांतिकारक तत्वज्ञान मांडले. हा क्रांतिकारी विचार केवळ राजकीय नाही तर सर्व मानवी इतिहास, साऱ्या अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि निसर्ग यांच्यावर प्रकाश टाकतो. या तत्वज्ञानात द्वंद्वात्मक पद्धती आणि भौतिकवाद यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे विचार आणि व्यवहार यांच्या एकतेमधून क्रांतिकारक परिवर्तन घडवता येते.
"तत्वज्ञांनी केवळ विविध प्रकारे जगाचा अर्थ लावला आहे. मुद्दा जग बदलण्याचा आहे." मार्क्स म्हणाला होता.
मार्क्स आणि एंगल्स यांचे आणखी एक महत्वाचे विधान आहे: "दुसऱ्या देशाला दडपून टाकणारे कुठलेही राष्ट्र स्वतंत्र असू शकत नाही. या सूत्राचा उपयोग विसाव्या शतकात वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यांच्या विरोधातील लढे उभारण्यासाठी झाला. मार्क्सला भारताविषयी मर्यादितच माहिती होती, तरीही त्याने भारतावरील लेखमालेत भारतीय हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करून उठतील, असे भाकीत केले होते."
सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर मार्क्सवाद मृत झाल्याचे भांडवली विचारवंतांनी घोषित करून टाकले. इतकेच नव्हे, तर इतिहासच संपला, इतिहासाचा अंत झाला असे जाहीर करून टाकले. पण पंचवीस वर्षांतच या घोषणा बहाद्दरांवर आपले शब्द गिळायची पाळी आली. त्यांचा विजयोन्माद कुठे आणि कसा विरून गेला समजलेही नाही.
सर्व विकसित भांडवली राष्ट्रांना अति विषमतेच्या कॅन्सरने पोखरून टाकले आहे, याबद्दल सर्व विचारसरणींचे अर्थशास्त्रज्ञ चिंतित आहेत. गेल्या सत्तर वर्षांत ही विषमतेची खाई आजवर नव्हती इतकी वाढली आहे. "जगातल्या आजवरच्या कोणत्याही समाजापेक्षा अमेरिकेतील विषमता भयानक आहे," असे थॉमस पिकेटी हा फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ म्हणतो. जगाच्या स्तरावर सर्वात वरच्या एक टक्का लोकांच्या हातात जगातली ५१ टक्के संपत्ती आहे. ही जागतिक वित्त भांडवलाची देणगी आहे.
या भीषण वास्तवाचे कार्ल मार्क्सला बिलकूल आश्चर्य वाटले नसते. भांडवलशाही पार करून शोषण आणि सामाजिक अन्यायविरहीत समाजवादी व्यवस्था कशी निर्माण करायची याचा शास्त्रीय सिद्धांत आणि कृती कार्यक्रम मार्क्सने कामगार वर्ग आणि इतर कामकऱ्यांच्या हाती दिला. या वर्षी आपण ऑक्टोबर क्रांतीची शाताब्दी साजरी करत आहोत. तसेच, हे वर्ष 'दास कॅपिटल'चे, त्याच्या 'भांडवल' या ग्रंथाच्या प्रकाशनाचे १५० वे वर्ष आहे. पुढील वर्ष मार्क्सजन्माच्या द्वीशताब्दीचे वर्ष आहे. या सर्व प्रसंगांचा उपयोग आपला मार्क्सवाद- लेनीनवादाविषयीचा समज वाढवण्यासाठी, अधिक सखोल करण्यासाठी केला पाहिजे. त्याच्या आधारे २१ व्या शतकातील भारतात समाजवादाची आखणी करायच्या कामाला लागले पाहिजे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे. असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे- रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर-
mahacpim@gmail.com
आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता.
Jeevan Marg
A/C Number- 04220100009541
IFSC CODE- BARBOWRLIX
Bank of Baroda, Worli Branch

मार्क्सचे अनुयायी म्हणुन महाराष्ट्रात स्वातंत्र्य पूर्व काळात सुरु झालेले शेतकरी कामगारांचे लढे पुढे काँग्रेस च्या बहुजन समाजाच्या हाती सत्ता या धोरणापुढे कुचकामी ठरले . तत्कालिन शेतकरी कष्टकरी वर्गाच्या पुढाऱ्यांना काँग्रेस जवळची वाटली , एका विचाराने त्यांचे असे वागणे बरोबरच होते कारण पंडित नेहरूंच्या नेतृत्वात साम्यवाद होताच पण काँग्रेस वर असणारा भांडवलदारांचा पगडा त्यांच्या वैचरिक तसेच राजकिय प्रगतीस मारक ठरला असेंहि म्हणता येईल .
ReplyDelete