Posts

ऐतिहासिक कर्जमाफी की ऐतिहासिक फसवणूक?

Image
डॉ. अजित नवले किसान सभेचे राज्य सरचिटणीस व शेतक-यांच्या सुकाणू समितीचे समन्वयक ------------------------------ -------------------------------------------------------------------------------------------- हा लेख एग्रोवन मधून पुनर्प्रकाशित केला आहे. सरकारने कर्जमाफीसाठी जाहीर केलेले निकष पाहता `राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला` या उक्तीची प्रचीती येते. निकषांची पाचर मारल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोजकीच राहणार आहे. पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात आकड्यांची हेराफेरी केली आहे.  ------------------------------ ---------- शेतक-यांच्या अभूतपूर्व आंदोलनानंतर नमलेल्या राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करताना ही आजवरची सर्वात ‘मोठी’ व ‘ऐतिहासिक’ कर्जमाफी असल्याचा दावा केला. सरकारच्या दाव्यानुसार ३४ हजार कोटी रुपयांच्या या कर्जमाफीचा ८९ लाख शेतक-यांना लाभ होणार आहे आणि त्यातील ४० लाख शेतक-यांचे सातबारा कोरा होणार आहे. परंतु सरकारने कर्जमाफीसाठी जाहीर केलेले निकष पाहता `राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला` या उक्तीची प्रचीती येते. ...

कर्जमाफी : दावे आणि वास्तव

Image
डॉ अजित नवले, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा समन्वयक, शेतकऱ्यांची समन्वय समिती, महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनानंतर अखेर महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. आपली कर्जमाफी ही आजवरची सर्वात ‘ मोठी ’ व ‘ ऐतिहासिक ’ असल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकारच्या दाव्यानुसार ३४ हजार कोटी रुपयांच्या या कर्जमाफीचा ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ४० लाख शेतकऱ्यांचे सातबारा यामुळे कोरे होणार आहेत. शेतकऱ्यांना यामुळे मोठा ‘ दिलासा ’ मिळाला आहे. असे असताना शेतकऱ्यांची तरूण पिढी मात्र सरकारच्या या दाव्यांशी सहमत नाही. सरकारचे ‘ दावे व वास्तव ’ त्यामुळे तपासून पहावे लागणार आहेत. सरकारने पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांवर १ लाख १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. सरकार कर्जमाफीतून त्यापैकी फक्त ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करणार आहे. म्हणजेच कर्जमाफी वजा जाता शेतकऱ्यांच्या डोक्यावर ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज तसेच शिल्लक राहणार आहे. एकूण कर्जातील केवळ २९.८२ टक्के कर्ज माफ होत आहे. ७०.१८ टक्के कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर तसेच शिल्लक राहणार आहे. कर्जम...

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)कडून जातीयवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चा पॉलीट ब्युरो जातीयवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) दिल्लीजवळ लोकल ट्रेनमध्ये एका मुस्लीम कुटुंबावर झालेल्या जातीयवादी हल्लाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. या हल्ल्यात जुनैद या १५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला व त्याचा भाऊ शाकीर याच्यावर चाकूने गंभीर घाव करण्यात आले आहेत. त्यांचा तिसरा भाऊ हाशिम हा देखील या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे लोक घोषणाबाजी करत मोठे चाकू, सुरे घेऊन त्यांच्यावर चाल करून गेले. या तरूण मुलांनी दिल्लीला साधारणपणे सायंकाळी ५ वाजता हरियाणातील बल्लभगढ येथे जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडली. जुनैद आणि त्याचा धाकटा भाऊ दोघे सूरत येथील एका मदरश्यामध्ये शिकत होते व ते ईदच्या वार्षिक सुट्टीसाठी आपल्या घरी आलेले होते. तुघलकाबाद स्टेशनवर काही लोक चढले आणि त्यांनी ह्या भावांना घाणेरड्या जातीयवादी भाषेत छळायला सुरवात केली. त्यांनी विरोध केला असता, त्यांच्यावर जातीयवादी घोषणा देत हल्ला केला गेला. जुनैदला गाडीतच मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. शाकीरची दाढी उपटून...

उन्मादाला ‘चपराक’ अशी बसेल की... संजय पवार

Image
आम्हाला कायमच असं वाटत आलं, किंबहुना ते आमचं ठाम मतच आहे असं समजा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजेच आरएसएस तथा संघ परिवार म्हणून जो काही आहे, त्याचा आवाका मर्यादित, आव मात्र खंडीभर. मुळात नावात ‘ राष्ट्रीय ’ असलेल्या या संघटनेला नेमके कोणते राष्ट्र अपेक्षित आहे हे आता सर्वांना माहीत आहे. त्यांना राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणायचं असतं. हे हिंदू राष्ट्र त्यांना ब्राह्मणी वर्चस्वाच्या हिंदू धर्माचं राष्ट्र म्हणून अभिप्रेत आहे. पण ५४, ५५, ५६ किंवा ५७ इंची छातीवर हात ठेवून तसं स्पष्ट म्हणायची धमक संघाच्या जन्मापासून आजतागायत त्यांच्यात नाही. गुळगुळीत, मुळमुळीत काहीतरी बोलत राहायचं. हिंदू बहुसंख्य म्हणजे हे हिंदू राष्ट्रच आहे. सोयीने ते हिंदू धर्माभिमानी असतात आणि सोयीने हिंदू एक जीवनपद्धती असंही म्हणतात. असं म्हणताना मग इथले बिगर हिंदू मिहणजे शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान हे पण त्या अर्थाने हिंदूच. अत्यंत पाताळयंत्री, दामटून खोटे बोलणं आणि अंगाशी आलं की, दात फिस्कारून हसणं ही या परिवाराची वैशिष्ट्यं आहेत. इतर धर्मियांबद्दल विशेषत : मुसलमानांबद्दल अत्यंत विखारी, विषारी प्र...

मोदी सरकार : शेतकऱ्यांशी केलेल्या गद्दारीची तीन वर्षे!

Image
(२जून रोजी अखिल भारतीय किसान सभेने प्रसिद्ध केलेले निवेदन) भारतीय शेती दिवाळखोर कॉर्पोरेट मार्गावर ! ना शेतमालाला रास्त भाव, ना कर्जाच्या सापळ्यातून सुटका, फक्त वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि स्थलांतर ! पंतप्रधान पीक विमा योजना म्हणजे केवळ जनतेच्या पैशांची लूट ! भूसंपादन अध्यादेश, गुरांच्या व्यापारावर बंदी हे शेतकऱ्यांवर प्रचंड हल्ले ! ---------------------------------------------------------------------------------------------------------------------- तीन वर्षांच्या या मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांचा पूर्णत : भ्रमनिरास केला आहे. पूर्वीच्या युपीए सरकारच्या कार्यकाळात असलेले शेतकी अरिष्ट हे पंतप्रधान दूर करतील, आर्थिक धोरणे योग्य दिशेने राबवतील ही शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. २०१५ साली काढलेला कुप्रसिद्ध भूसंपादन अध्यादेश जनक्षोभामुळे सरकारला मागे घ्यावा लागला. मात्र यातून  भाजपचा कॉर्पोरेट धार्जिणा चेहरा स्पष्टपणे दिसून आला. देशाच्या इतिहासात प्रथमच २०१५-१६ साली कृषीक्षेत्र व किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात थेट परकीय भांडवल गुंतवणुकीला सरकारी परवानगी मिळाली....